
एक तरुण भाची देखण्या मामाच्या प्रेमात पडल्याची घटना समोर आली आहे. मामाला पाहताच ती तरुणी त्याच्या प्रेमात पडली आणि त्यांची प्रेमकहाणी अशा शिखरावर पोहोचली की त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या. मुलीच्या घरच्यांना या प्रेमप्रकरणाची माहिती मिळताच दोघेही घरातून पळून गेले. नंतर परत आल्यावर त्यांनी पोलीस ठाणे गाठून आपण प्रौढ असल्याचा पुरावा दिला. त्यांच्या या निर्णयामुळे दोघांचेही कुटुंबीय पोलिसात गेले होते. शेवटी मामा-भाचीच्या प्रेमापुढे कुटुंबाला नतमस्तक व्हावे लागले. या तरुण आणि तरुणीचे मंदिरात लग्न झाले.
घरातून पळून गेले मामा आणि भाची
मध्य प्रदेशातील डाबरा येथे ही घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वीच मामा आणि भाची न सांगता घरातून पळून गेले होते. त्यानंतर प्रयागराजहून परतल्यावर त्यांनी पोलीस ठाणे गाठून आपल्या प्रौढत्वाचा दाखला दिला. भितरवार पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या या तरुणीचे शिवपुरी जिल्ह्यातील रामनगर येथील अवनीश कुशवाह याच्यासोबत २ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ही मुलगी अवनीशची भाची असल्याचे समोर आले होते. दोघांमध्ये प्रेम फुलले आणि ते 30 मार्च रोजी घरच्यांना न सांगता ते पळून गेले. इकडे मुलगी घरातून पळून गेल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी दोघांचा शोध सुरू केला.
वाचा: ‘हे तुझं मुल नाहीये…’, IPLच्या काळात क्रिकेटपटू पतीच्या मित्रासोबतच थाटला पत्नीने संसार
नंतर पुरावा दिला
पोलिसात तक्रार केल्याची माहिती तरुण व तरुणीला समजताच दोघेही गुरुवारी घरी परतले. आल्यावर त्यांनी थेट भितरवार पोलिस ठाणे गाठले. पोलीस ठाण्यात त्यांनी प्रेमाची कबूली दिली आणि एकत्र राहायचे असल्याचे सांगितले. लग्नाला कुटुंबीयांची सहमती नसल्यामुळे ते प्रयागराजला पळून गेल्याचे देखील सांगितले. त्यांनी त्यांच्या प्रौढत्वाचा पुरावा सादर केला आणि एकमेकांशी लग्न केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.
दोघांनीही केले लग्न
मुलगी पोलिस ठाण्यात आल्याची माहिती कुटुंबीयांना मिळताच त्यांनीही पोलिस ठाणे गाठले. तेथे अवनीश व मुलीने आपापल्या घरच्यांना समजावून सांगितले आणि शेवटी दोघांच्याही घरच्यांनी त्यांच्या लग्नाला होकार दिला. हनुमान मंदिरात नेऊन त्यांचे लग्न लावून दिले. आता मामा आणि भाचीचे प्रेम व नंतर लग्न या प्रकरणाने सगळेच हैराण झाले आहेत.