आलिशान कार मॉर्डन साहित्य वापरुन सहज चोरायचा, आणि रस्ते मार्गे परराज्यात नेऊन विकायचा, MBA ग्रॅज्युएट चोराने 100 हून अधिक कार चोरल्या

तो आरामात लक्झरी कार चोरी करायचा आणि त्यांना राज्याबाहेर नेऊन विकायता. गेली २० वर्षे त्यांचा हा कारनामा सुरु होता. त्याला अखेर अटक झाली असून पुढील तपास सुरु आहे.

आलिशान कार मॉर्डन साहित्य वापरुन सहज चोरायचा, आणि रस्ते मार्गे परराज्यात नेऊन विकायचा,  MBA ग्रॅज्युएट चोराने 100 हून अधिक कार चोरल्या
mba thief
| Updated on: Jul 21, 2025 | 5:12 PM

तामिळनाडूच्या चेन्नई पोलिसांनी राजस्थानातून एका अशा चोराला अटक केली आहे. जो गेली २० वर्षे चोरी करीत होता. या २० वर्षात त्याने १०० हून अधिक आलिशान कार चोरी केल्या आणि त्यांनी विकून आलिशान जिंदगी जगत होता. तो वेग-वेगळ्या राज्यातून कार चोरी केल्या आहेत. त्याने तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, पुदुतेरी सारख्या अनेक राज्यातीन लक्झरी कार चोरी केल्या आहे. कार चोरी केल्यानंतर त्यांना तो राजस्थान आणि नेपाळमध्ये विकायचा..

तामिळनाडूच्या चेन्नईतील अण्णानगरात कार चोरीला गेली होती. पोलिसांना चोर पुदुचेरी लपल्याची बातमी मिळाली. त्यानंतर पोलिस तेथे गेले. पोलिसांना तेथून लपलेल्या कार चोर सतेंद्र शेखावत याला अटक केली आणि चौकशीसाठी चेन्नईला घेऊन गेली.त्यानंतर त्याला कोर्टात सादर करुन जेलमध्ये तो कोठडीत आहे.

गेल्या महिन्यातील चोरीतून खुलासा

चेन्नईतील अण्णानगरातील कथिरावन कॉलनीत राहणाऱ्या एथिराज रथिनम यांनी गेल्या महिन्यात त्यांची महागडी लक्झरी कार त्यांच्या दरवाजासमोर ठेवली होती. सकाळी-सकाळी एक इसम आला आणि त्याने मॉडर्न टुल्सचा वापर करुन ही कार पळवली. आपल्या डोळ्यादेखत कार पळवल्याने एथिराज हैराण झाले. त्यांनी सीसीटीव्ही तपासले आणि तिरुमंगलम पोलिसात तक्रार दाखल केली.

वेगवेगळ्या राज्यातून चोरी

पोलिसांनी या प्रकरणात केस दाखल करीत सीसीटीव्ही आधारे तपास सुरु केला. तेव्हा कळले की संशयित चोर पुदुचेरीत लपला आहे. त्यानंतर पोलिसांना तेथे जाऊन सतेंद्र सिंह शेखावतला अटक केली.तपासात सतेंद्र सिंह शेखावत हा राजस्तानचा असून एमबीए ग्रॅज्युएट आहे. आणि त्याचे वडील एक रिटायर्ड आर्मी ऑफीसर आहेत. गेल्या २० वर्षात सतेंद्र सिंह याने आधुनिक उपकरणाच्या मदतीने तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि पुदुचेरी सह अनेक राज्यात लक्झरी कार चोरी करायचा आणि त्यांना थेट रस्त्यावरुन राजस्थान आणि नेपाळमध्ये नेऊन विक्री करुन पैसे कमवायचा.

100 हून अधिक लक्झरी कार चोरल्या

सतेंद्र याने आतापर्यंत 100 हून अधिक लक्झरी कार चोरल्या आहे. त्यांना विकून कोट्यवधी रुपये जमवून आरामाचे जीवन जगत होता. चेन्नई पोलिसांनी त्याला अटक करुन आता कोर्टात सादर केले आहे. आरोपीला अटक केल्यानंतर १० हून अधिक तक्रारदार पुढे आले आहेत. त्यांच्या कारही चोरीला गेल्याचे गाऱ्हाणे त्यांनी सांगत तिरुमंगलम पोलिसांना विनवणी केली आहे.