AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘जर काही समजत नसेल तर करंट दे…’,दीराच्या प्रेमात पत्नीने नवऱ्याला संपवले,चॅटवरुन कट उघड

समाजातील नितीमत्ता नष्ट झाल्याने एकामोगामाग अनैतिक संबंधातून हत्या झाल्याची अनेक प्रकरणे एकामागून एक उघडकीस येत आहेत. या प्रकरणात संपूर्ण हत्येचा कट चॅटींगमधून उघडकीस आला आहे.

'जर काही समजत नसेल तर करंट दे...',दीराच्या प्रेमात पत्नीने नवऱ्याला संपवले,चॅटवरुन कट उघड
murder case
| Updated on: Jul 19, 2025 | 8:44 PM
Share

Delhi Murder Case: समाजात नैतिक – अनैतिकेत असे काही अंतरच उरलेले नाही. अनैतिक संबंधाचे एकामागोमाग अशी प्रकरणे उघडकीस येत आहेत ती पाहाता समाज कुठल्या स्तराला गेला आहे याचे कोडे पडावे. दिल्लीतील द्वारका परिसरातून एक भयंकर प्रकरण उघडकीस आले आहे. येथे एक लग्न झालेल्या गृहीणीने आपल्या दीराच्या मदतीने आपल्या पतीची निर्घृण हत्या केल्याचे उघडीस आले आहे. पोलिसांनी वहिनी आणि दीराच्या दरम्यान झालेली इंस्टाग्राम चॅट्स जप्त केली आहे.या चॅट्सने नातेसंबंधातील कट उघड झाला आहे.

काय आहे पूर्ण प्रकरण ?

दक्षिण-पूर्व द्वारका परिसरातील ३५ वर्षांच्या करण देव याची हत्या त्याची पत्नी सुश्मिता देव आणि भाऊ राहुल देव यांनी केल्याचे उघडकीस आले आहे. १३ जुलै रोजी संयशास्पद स्थितीत करणचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर पोलिसांचा संशय बळावला आणि अनेक अंगाने तपास सुरु करण्यात आला.

खुनाचा हा प्रकार असल्याचे तपास करताना उघड झाले. आपला पती करंट लागून बेशुद्ध पडल्याने त्याला तातडीने रुग्णालयात नेले आणि तेथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केले. सुश्मिता आणि राहुल आणि त्याच्या वडिलांनी पोस्टमार्टेमचा विरोध केला. ज्यामुळे कुटुंबावर संशय आला आणि पोलिस चौकशीची मागणी झाली.

मोबाईल चॅट्स उघडकीस आले

करण याचा छोटा भाऊ कुणाल याला वहिनीच्या ( सुश्मिता ) मोबाईलमध्ये असे चॅट्स सापडले जे वाचून त्याला धक्का बसला. या चॅट्समुळेच सर्व बिंग फुटले. या चॅटींगमध्ये राहुल आणि सुश्मिता करणच्या हत्येचा कट कसा रचत होते ते उघड झाले. चॅटींगमध्ये राहुल सुश्मिता हीला करणला विष देण्याचा आणि इलेक्ट्रीक शॉक देण्याचा सल्ला देत होता.

काय झाले संभाषण ?

सुश्मिता: बघ औषध देऊन मरायला किती वेळ लागत आहे.तीन तास झालेत, न उल्टी होत आहे. न पॉटी, काहीच नाही.मेला देखील नाही

राहुल: जर काही समजत नसेल तर करंट दे..

सुष्मिता: कसं बांधू त्याला करंट देण्यासाठी ? राहुल: टेपने बांध…

सुष्मिता: श्वास खूप हळू चालू आहे.

राहुल: जेवढे औषध आहे तेवढे सगळे देऊन टाक

सुष्मिता: तोंड नाही उघडत आहे, पाणी टाकू शकते, पण औषध देऊ शकत नाही. तुच ये आता, मिळून काही तरी प्रयत्न करुयात.

पोलिसांनी दोघांना अटक केली

पोलिसांनी हा इंस्टाग्राम चॅटसमोर आल्यानंतर सुश्मिता आणि राहुल यांना अटक केली आहे. त्यांची चौकशी चालू आहे, तसेच आणखीन पुरावे गोळा केले जात आहेत.

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.