धक्कादायक… व्यसनाची सवय लावून लहान बहिणीलाच वेश्या व्यवसायात ढकलले

पीडित मुलीच्या मोठ्या बहिणीने पैशासाठी तिला अनेकदा वेगवेगळ्या लोकांकडे पाठवले होते. | Sex trade

धक्कादायक... व्यसनाची सवय लावून लहान बहिणीलाच वेश्या व्यवसायात ढकलले
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Jun 22, 2021 | 11:05 AM

भोपाळ: मध्य प्रदेशच्या भोपाळ येथे एका मोठ्या बहिणीनेच आपल्या लहान अल्पवयीन बहिणीला वेश्या व्यवसायात (Sex Trade) ढकलल्याचा प्रकार समोर आला आहे. या बहिणीने आपल्या बहिणीला प्रथम अमली पदार्थांचे व्यसन लावले. त्यानंतर तिला वेश्या व्यवसायात जाण्यासाठी प्रवृत्त केले. याप्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीच्या मोठ्या बहिणीसह सहा लोकांना अटक केली. (Minor girl pushed into sex trade by sister in Bhopal)

पीडित मुलीच्या आईने या सगळ्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पीडित मुलीच्या मोठ्या बहिणीने पैशासाठी तिला अनेकदा वेगवेगळ्या लोकांकडे पाठवले होते.

बहिणीने लावले व्यसन

गांधी नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थाचे सेवन करताना पकडण्यात आल्यानंतर पीडितेला एका स्वयंसेवी संस्थेकडे समुपदेशनासाठी पाठवण्यात आले होते. त्यावेळी पीडित मुलीने आपल्या मोठ्या बहिणीने आपल्याला व्यसन लावल्याचे सांगितले. त्यानंतर या पीडित मुलीच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करण्यात आले. यावेळी पीडितेच्या आईने पोलिसांशी संपर्क साधून घडल्या प्रकाराबद्दल माहिती दिली. त्यानंतर पोलिसांकडून मानवी तस्करी, बलात्कार, पॉस्को या कायद्यातंर्गत गुन्हे दाखल केले.

पीडित मुलीला पाठवले इंदूरला

दोन वर्षांपूर्वी मोठ्या बहिणीने आपल्याला ड्रग्जचे व्यसन लावल्याचे पीडितेने सांगितले. त्यानंतर मला इंदूरला एका माणसाकडे पाठवण्यात आले. त्या माणसाने आपल्यावर बलात्कार केला. या माणसाने आपल्या मोठ्या बहिणीला 2000 रुपये दिले. या आरोपीची ओळखही पटली. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या:

चार वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करुन जिवंत गोणीत बांधून फेकले, पोलिसांच्या सतर्कतेने चिमुकलीला जीवनदान

महाराष्ट्रात किती टक्के महिलांवर पतीकडून हिंसाचार? NHS च्या अहवालात धक्कादायक खुलासे

घरात घुसून महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, धारदार शस्त्र दाखवत जीवे मारण्याची धमकी, डोंबिवलीतील धक्कादायक घटना

(Minor girl pushed into sex trade by sister in Bhopal)