AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अल्पवयीन मुलीवर धावत्या रेल्वेत लैंगिक अत्याचार, टॉयलेटमध्ये नेऊन सैतानानं लचके तोडले!

धावत्या रेल्वेत एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कदायक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.

अल्पवयीन मुलीवर धावत्या रेल्वेत लैंगिक अत्याचार, टॉयलेटमध्ये नेऊन सैतानानं लचके तोडले!
kalyan crime news
| Updated on: Jul 11, 2025 | 6:50 PM
Share

Kalyan Crime News : धावत्या मेल एक्सप्रेसमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. कल्याणमध्ये एका मुलीला फूस लावून तिला मेल एक्स्प्रेसमध्ये बसवून आरोपीने तिच्यावर हा अत्याचार केला आहे. विशेष म्हणजे अत्याचार करून त्याने मुलीला आपल्या घरीही नेलं होतं. पण घरच्यांनी पीडित मुलीला तिला परत सोडून देण्यास सांगितल्यानंतर मुलीला अकोला रेल्वेस्थानकावरच सोडून आरोपीने पळ काढला. त्यानंतर हे सर्व प्रकरण समोर आले आहे. या घटनेनंतर आता सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने कल्याण रेल्वेस्थानकात एका अल्पवयीन मुलीसोबत मैत्री केली. त्यानंतर तिला अकोल्याला घेऊन जात असताना धावत्या मेल एक्सप्रेसच्या बाथरूममध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या आरोपीला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गजानन चव्हाण असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीने अत्याचारानंतर पीडित अल्पवयीन मुलीला आकोला जिल्ह्यातील आपल्या घरी नेले होते. मात्र आई-वडिलांनी विरोध करत मुलीला घरी सोडण्यास सांगितल्याने आरोपीने तिला कल्याणला न सोडता अकोला रेल्वे स्थानकावरच सोडून पळ काढला. यानंतर अकोला पोलिसांनी या प्रकरणी अत्याचाराचा गुन्हा दाखल करत चौकशी चालू केली. तसेच कल्याण लोहमार्ग पोलिसांकडे तो गुन्हा वर्ग केला. या प्रकरणात कल्याण लोहमार्ग पोलिसांनी तपास करत आरोपीला अकोल्यातून बेड्या ठोकत कल्याणमध्ये आणलं. कल्याण रेल्वे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 15 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आधी जवळीक निर्माण केली, नंतर…

कल्याण पूर्वेत राहणारी 16 वर्षीय तरुणीची 29 जून रोजी कल्याण स्टेशन परिसरात आली होती. कल्याण पश्चिमेकडून पूर्वेकडे पादचारी पुलावरून जात असताना तिला आकोला येथे राहणारा आरोपी गजानन चव्हाण भेटला होता. त्याने तिच्याशी ओळख वाढवत तिच्याशी गप्पा मारत जवळीक निर्माण तेली. नंतर तिला कल्याण स्थानकातून अकोल्याकडे जाणाऱ्या मेल एक्स्प्रेस गाडीत बसवलं. पुढे इगतपुरी ते अकोल्यादरम्यान तिला एक्सप्रेसच्या टॉयलेटमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केले.

मुलीला स्टेशनवरच सोडून काढला पळ

एवढ्यावरच तो थांबला नाही. यानंतर तो तिला त्याच्या अकोला जिल्ह्यातील घरी घेऊन गेला. मात्र घरच्यांनी तिला स्वीकारण्यास नकार देत तिला घरी सोडण्यास सांगितल्याने. आरोपीने तिला कल्याणला न सोडता अकोला स्टेशनवरच सोडून पळ काढला. यानंतर अकोला पोलिसांनी याप्रकरणी अत्याचाराचा गुन्हा दाखल करत कल्याण लोहमार्ग पोलिसांकडे तो गुन्हा वर्ग केला होता. या प्रकरणात कल्याण लोहमार्ग पोलिसांनी तपास करत आरोपीला अकोल्यातून बेड्या ठोकत कल्याणमध्ये आणले. त्यानंतर आरोपीला कल्याण रेल्वे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 15

जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. अल्पवयीन मुलीची फसवणूक करून रेल्वेत अत्याचार केल्याने त्याला कठोरातील कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली जात आहे.

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट