मीरा रोड सरस्वती वैद्य हत्या प्रकरण, रोज नवनवीन खुलासे, काय म्हणाला आरोपी?

| Updated on: Jun 10, 2023 | 10:20 AM

मुंबईला हादरवून सोडणाऱ्या सरस्वती वैद्य हत्याकांड प्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आरोपी मनोज साने सध्या पोलीस कोठडीत आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.

मीरा रोड सरस्वती वैद्य हत्या प्रकरण, रोज नवनवीन खुलासे, काय म्हणाला आरोपी?
सरस्वती वैद्यच्या मृतदेहावर बहिणी करणार अंत्यसंस्कार
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मीरा रोड : सरस्वती वैद्य हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. मीरा रोड येथील गीतानगर येथे लिव्ह इन पार्टनरनेच तरुणीची हत्या केल्याचे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी तरुणीच्या पार्टनरला अटक केली असून, सध्या तो पोलीस कोठडीत आहे. पोलिसांकडून त्याची सखोल चौकशी सुरु आहे. पोलीस चौकशीत आरोपी मनोज साने याने आता नवी माहिती दिली आहे. सरस्वती वैद्यच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपी मनोज साने याने गुगलचा आधार घेतला होता. गुगलवर सर्च करुन त्याने सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. पोलीस याबाबत आरोपीकडे अधिक चौकशी करत आहेत.

अनाथ आश्रमात शिक्षण, मग नोकरीसाठी मुंबई गाठली

सरस्वती वैद्य अनाथ नसून, तिला एकूण पाच बहिणी आहेत. यापैकी तीन बहिणी घटना उघडकीस आल्यानंतर समोर आल्या आहेत. सरस्वतीची आई लहानपणीच वारली, तर वडिलही आधीच सोडून गेले होते. मयत सरस्वती ही मूळची छञपती संभाजी नगर येथील राहणारी आहे. आई-वडिलांच्या निधनानंतर सरस्वतीचं शिक्षण अहमदनगर येथील जानकीबाई आपटे बालिका अनाथ आश्रमात झालं. तेथे तिचं दहावीपर्यंत शिक्षण झालं. यानंतर अठरा वर्षाची झाल्यावर तिला आश्रम सोडावं लागलं. मग तिने मुंबई गाठली. मुंबईला आपल्या नातेवाईकाकडे नोकरीसाठी बोरिवली येथे आली होती.

सरस्वतीच्या हत्येचे गूढ कायम

बोरिवलीमध्ये आरोपी मनोज साने याच्याशी सरस्वती वैद्यची रेशनच्या दुकानात ओळख झाली होती. आरोपी मनोज साने याने सरस्वतीशी मंदिरात लग्न केलं होतं. मात्र दोघांच्या वयामध्ये अंतर खूप असल्याने मनोजने ही गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवली होती. यामुळे सरस्वती त्याला मामा बोलायची. सरस्वती वैद्य हत्येच्या गूढ अद्याप कायम आहे. सरस्वती वैद्यने आत्महत्या केली होती, असा आरोपी मनोज सानेने दावा केला आहे. मात्र पोलिसांना मनोजच्या बोलण्यावर विश्वास नाही. पोलीस आरोपीची लगातार चौकशी करत आहेत.

हे सुद्धा वाचा