महाराष्ट्रात येऊन बागेश्वर बाबा कोणत्या चमत्काराचा दावा करणार? पोलिसांची करडी नजर, आयोजकांना थेट नोटीस, वाचा सविस्तर

| Updated on: Mar 18, 2023 | 1:42 PM

मीरा रोड येथील सेंट्रल पार्क मैदानात धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांच्या दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या आयोजकांना मीरा रोड पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

महाराष्ट्रात येऊन बागेश्वर बाबा कोणत्या चमत्काराचा दावा करणार? पोलिसांची करडी नजर, आयोजकांना थेट नोटीस, वाचा सविस्तर
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मीरा रोड / विनायक डावरुंग – रमेश शर्मा : मीरारोड येथील सेंट्रल पार्क मैदानात धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांचे दिव्य दर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शांताबेन मिठालाल जैन चॅरीटेबल ट्रस्ट तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मीरारोड पोलिसांनी या कार्यक्रमाच्या आयोजकांना सीआरपीसी 149 अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे. बागेश्वर धाम सरकार कार्यक्रम आयोजक कमिटी सदस्य सुरेश खंडेलवाल यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. दोन दिवस (18 मार्च आणि 19 मार्च) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यात 10 हजाराहून अधिक भाविक सहभागी होणार आहेत.

काय म्हटलंय नोटीशीत?

धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी यापूर्वीच्या कार्यक्रमात अंधश्रद्धा पसरवून समाजाचे विविध मार्गाने आर्थिक मानसिक शोषण करणे, चमत्काराचा दावा करुन लोकांची दिशाभूल आणि फसवणूक केली जाते. तसेच महाराष्ट्रातील महापुरुषांचा अवमान करतात. त्यामुळे अखिल भारतीय निर्मूलन समिती, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, संभाजी ब्रिगेड आणि काँग्रेस पक्षाते पदाधिकारी यांनी कार्यक्रमाला विरोध असल्याची तक्रार मीरा रोड पोलीस ठाण्यात दिली.

या तक्रारीची दखल घेत मीरारोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह बागल यांनी ही नोटीस बजावली आहे. महाराष्ट्रातील संत आणि महापुरुषांचा अपमान होणार नाही, कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील, कुणाच्या वैयक्तिक भावना दुखावतील असे वक्तव्य, भाष्य, घोषणा, हावभाव होणार नाहीत. तसेच दोन धर्मात तेढ निर्माण होणार नाही, भाविकांची दिशाभूल करुन समाजामध्ये अंधश्रद्धेचा प्रसार होणार नाही याची गांभीर्याने दक्षता घेण्याचा इशारा देत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे नोटीशीत म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा