महाराष्ट्रात आलेल्या बागेश्वर बाबाला बेड्या ठोका? राज्यातील ‘या’ पक्षाने केली मागणी, जुनी आठवणही सांगितली

मुंबई येथील मीरा रोड येथे वादग्रस्त वक्तव्यासह आपल्या विविध दाव्यांमुळे संपूर्ण देशात परिचित असलेले बागेश्वर महाराज यांचा कार्यक्रम होत आहे. जून संदर्भ देऊन त्याच्यावर अटकेची कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

महाराष्ट्रात आलेल्या बागेश्वर बाबाला बेड्या ठोका? राज्यातील 'या' पक्षाने केली मागणी, जुनी आठवणही सांगितली
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Mar 18, 2023 | 1:07 PM

मुंबई : संपूर्ण देशात वादग्रस्त विधानामुळे परिचित असलेल्या बागेश्वर धाम येथील धीरेंद्र शास्री महाराज यांचा मीरा रोड येथे मुंबई कार्यक्रम होणार आहे. लाखोंच्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असल्याचा दावा आयोजकांच्या वतीने करण्यात आला आहे. जोरदार तयारी या कार्यक्रमासाठी सुरू असून बागेश्वर बाबा देखील मुंबई दाखल झाले आहे. त्यांना चोख पोलिस बंदोबस्तात सभेस्थळी घेऊन जाणार आहे. यापूर्वी पोलिसांनी आयोजकांना नोटिसही बजावली आहे. कुठला अनुचित प्रकार घडल्यास त्यास संपूर्ण जबाबदारी ही आयोजकांची असेल असा नोटिसमधून एकप्रकारे इशारा देण्यात असला तरी दुसरीकडे बागेश्वर बाबाला अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

बागेश्वर बाबा यांनी संत तुकाराम महाराजांच्या विषय अत्यंत चुकीचे विधान केले होते, त्यामुळे राज्यातील जनतेमध्ये संतापाची लाट उसळली होती. या बागेश्वर बाबाच्या विधानाचा निषेध राज्यातील जनतेने केला होता. त्यामुळे बागेश्वर बाबाच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे.

शिंदे आणि फडणवीस सरकार राज्यामध्ये आल्यापासून हे सरकार संतांच्या आणि शिवाजी महाराजांच्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे, गोरगरिबांचे, सामान्य जनतेचे सरकार आहे हे सतत माननीय मुख्यमंत्री सांगत आहे असे सचिन खरात यांनी म्हंटलं आहे.

हे सुद्धा वाचा

परंतु संत तुकाराम महाराज राज्याची अस्मिता आहे. तरीसुद्धा संत तुकाराम महाराजांचा अवमान करणाऱ्या बागेश्वर बाबाचा कार्यक्रम मीरा रोड येथे होणार आहे. त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करत आहे. बागेश्वर बाबाला अटक करा नाहीतर खुर्ची खाली करा असं खरात म्हणाले आहे.

यापूर्वी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नका अशी मागणी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने नाना पाटोले यांनी पत्राद्वारे केली होती. त्यावेळीही संत तुकाराम महाराज यांच्या विषयी जे वक्तव्य केले होते ट्याची आठवण करून देत मागणी केली होती. त्यानंतर या प्रकरणात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देखील उडी घेतली होती.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने यापूर्वी बागेश्वर बाबाकडून करण्यात आलेल्या डाव्यावर आक्षेप घेत खुलं आव्हान दिले होते. त्यानंतर संपूर्ण देशात बागेश्वर बाबा आणि अंनिसचा संघर्ष समोर आला होता. त्यानंतर बागेश्वर बाबाने संत तुकाराम महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावरून त्यांना मागी मागण्याची वेळ आली होती.

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.