फक्त 10 लोकांची तंतोतंत माहिती द्या, 30 लाख घेऊन जा, बागेश्वर बाबा यांना कुणाचं आव्हान?; आव्हान स्वीकारणार?

बागेश्वर बाबा आणि अंनिसचे श्याम मानव पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. बागेश्वर बाबा यांचा मिरारोड येथे आज कार्यक्रम आहे. त्याला अंनिसने विरोध केला आहे. तसेच बागेश्वर बाबांच्या विरोधात पोलिसात तक्रारही दिली आहे.

फक्त 10 लोकांची तंतोतंत माहिती द्या, 30 लाख घेऊन जा, बागेश्वर बाबा यांना कुणाचं आव्हान?; आव्हान स्वीकारणार?
Bageshwar BabaImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 18, 2023 | 10:02 AM

मुंबई : बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा काल मध्यरात्री मुंबईत दाखल झाले आहेत. मिरा भायंदर येथे त्यांचा आज कार्यक्रम होणार आहे. त्यांच्या या कार्यक्रमाला काँग्रेस आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विरोध केला आहे. अंनिसने तर जादूटोणा आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याचा आरोप करत बागेश्वर बाबांविरोधात मीरा रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच बागेश्वर बाबांनी 10 लोकांची खरी खरी माहिती द्यावी. त्यांनी 10 लोकांची योग्य माहिती दिल्यास त्यांना 30 लाख रुपये दिले जाईल, असं आव्हानच अंनिसने दिलं आहे. त्यामुळे बागेश्वर बाबा अंनिसचं आव्हान स्वीकारणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अंनिसचे श्याम मानव यांनी हे आव्हान बागेश्वर बाबांना दिलं आहे. बागेश्वर बाबांनी आमचं आव्हान स्वीकारलं नाही किंवा योग्य माहिती देण्यास अयशस्वी ठरले तर त्यांच्याकडे कोणतीह दिव्यशक्ती नसल्याचं स्पष्ट होईल, असं श्याम मानव यांनी म्हटलं आहे. श्याम मानव यांनी मिरारोड पोलीस ठाण्यात तसं पत्रं दिलं आहे. बागेश्वर बाबा हे जादूटोणा करतात. मंत्र म्हणून आजार बरा करण्याचा दावा करतात. हा प्रकार अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा आहे. यूट्यूबवर बागेश्वर बाबांचे अनेक व्हिडीओ आहेत. त्यावरून ते अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याचं स्पष्ट होतंय, असं श्याम मानव यांनी या पत्रात म्हटलं आहे. तसेच बागेश्वर बाबांविरोधात कारवाई करण्याची मागणीही केली आहे.

हे सुद्धा वाचा

वारंवार कायद्याचे उल्लंघन

नागपुरात बागेश्वर बाबांचा काल दिव्य दरबार पार पडला. त्यात कायद्याचे वारंवार उल्लंघन झाले आहे. डॉक्टरची पदवी नसलेल्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीवर उपचार करण्याचा दावा केला तरी ते कायद्याचे उल्लंघन ठरते. या दोन गोष्टींमुळे धीरेंद्र शास्त्री यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही विधानभवनात बागेश्वर बाबांना विरोध केला आहे. कारण या महाराजांनी तुकाराम महाराजांविरुद्ध अत्यंत चुकीचे विधान केले होते, असं श्याम मानव म्हणाले.

अंधश्रद्धा फैलावण्यास मज्जाव

महाराष्ट्रात ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज कायदा 2013 लागू आहे. या कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा फैलावण्यास मज्जाव करण्यात आला आहे. असं असतानाही अशा प्रकारचा कार्यक्रम होत असेल तर त्याला प्रशासनाने परवानगी देऊ नये, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. लोकांच्या बाबत सर्व जाणता येईल अशी कोणतीही दिव्यशक्ती धीरेंद्र शास्त्रींकडे यांच्याकडे नाहीये. त्यांच्याकडे 0 कोणतीही अशी शक्ती असेल तर त्यांनी आमचं आव्हान स्वीकारावं. दहा लोकांची तंतोतंत माहिती द्यावी. असं केल्यास आम्ही त्यांना 30 लाख रुपये रोख देऊ. त्यांनी तसं केलं नाही तर ते केवळ अंधश्रद्धा पसरवत असल्याचं सिद्ध होईल. त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली जाईल, असं ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.