लग्नाला तीन महिने, नवरदेवाच्या हाताची हळदही गेली नव्हती, अन्… अंगावर काटा आणणारी घटना समोर!

लग्न होऊन अवघ्या तीन महिन्यातच भरलेल्या घरावर दुखा: चा डोंगर कोसळला आहे. मोठ्या थाटामाटात लग्न झालं होतं, त्यानंतर तो दिल्लीला गेला. हॉटेलमध्ये एक रूम घेतली अन् तिथे... जे घडलं त्याने सर्वांनाच बसलाय धक्का!

लग्नाला तीन महिने, नवरदेवाच्या हाताची हळदही गेली नव्हती, अन्... अंगावर काटा आणणारी घटना समोर!
लग्नात नाचताना हृदयविकाराचा झटका
| Updated on: Apr 25, 2023 | 11:00 PM

Crime : लग्न होऊन अवघ्या तीन महिन्यातच भरलेल्या घरावर दुखा: चा डोंगर कोसळला आहे. मोठ्या थाटामाटात लग्न झालं होतं, त्यानंतर तो दिल्लीला गेला. हॉटेलमध्ये एक रूम घेतली तो तिथे राहत होता. मात्र चेकआऊटच्या दिवशी त्याचा मृतदेहच बाहेर काढण्यात आला. मोहम्मद अमीर असं संबंधित मृत तरूणाचं नाव होतं. दिल्लीतील करोलबाग येथील हॉटेल गोल्डन डिलक्समध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नेमकं काय घडलं?

मोहम्मद अमीर लग्न झाल्यानंतर तीन महिन्यांनी दिल्लीत आला होता. करोलबाग येथील हॉटेल गोल्डन डिलक्समध्ये रूम घेतली होती. तो तिथे राहत होता मात्र चेक आऊटच्या दिवशी त्याने दार काही उघडलं नाही. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी वाट पाहिली , दार वाजवलं पण काही फायदा झाला नाही. शेवटी हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्याच्या खोलीचा दरवाजा तोडला आणि आतमध्ये पाहिलं तर त्यांच्या पायाखालची वाळू सरकली.

मोहम्मद अमीर याने गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं होतं. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. यानंतर हॉटेलच्या मालकाने याबाबतची माहिती पोलिसांना फोन करून दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी त्या व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.

पोलिसांनी रूमची आणि बॅगची झडती घेतल्यावर एक मोबाईल, पॅनकार्ड आणि काही रक्कम सापडली आहे. सध्या मृताच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे. पोलीस चौकशीत त्या तरुणाचे तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाल्याचे समोर आले आहे. पण त्याने कोणत्या कारणामुळे इतका टोकाचा निर्णय का घेतला हे समजलं नसून सध्या याचा तपास पोलीस करत आहेत.