अवघ्या 15 वर्षाच्या मुलीवर 29 जणांकडून सामूहिक बलात्कार, पीडितेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार

15 वर्षाच्या चिमुकलीवर 29 जणांनी वेळोवेळी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे आरोपींपैकी काही जणांचे नातेवाईक हे राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे.

अवघ्या 15 वर्षाच्या मुलीवर 29 जणांकडून सामूहिक बलात्कार, पीडितेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार
सात वर्षानंतर लैंगिक अत्याचाराला फुटली वाचा

डोंबिवली (ठाणे) : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वारंवार बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या घटना समोर येत आहेत. आरोपी नराधम हे अल्पवयीन मुलींना देखील सोडत नाहीय. त्यामुळे राज्यातील महिला आणि मुलींच्या सुरक्षेच्या प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईपासून जवळ असलेल्या डोंबिवलीत तर प्रचंड संतापजनक घटना घडली आहे. या घटनेने तर सर्वच हद्द पार केल्यात. एका 15 वर्षाच्या चिमुकलीवर 29 जणांनी वेळोवेळी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे आरोपींपैकी काही जणांचे नातेवाईक हे राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे याच राजकीय वजनाचा माज मनात ठेवून आरोपींनी पीडितेवर बलात्कार केला का? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.

नेमकं प्रकरण काय?

डोंबिवलीत 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे डोंबिवली हादरली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात 29 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोन अल्पवयीन मुलांसह 23 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. विशेष म्हणजे आरोपींमध्ये काही राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक असल्याची देखील प्राथमिक माहिती समोर येत आहे.

प्रियकराने बलात्कार करत व्हिडीओ बनवला, नंतर ब्लॅकमेल करत 29 जणांचा बलात्कार

प्रियकराने जानेवारी महिन्यात पीडित मुलिवर बलात्कार करत व्हिडियो काढला होता. या व्हिडिओच्या आधारे पीडित अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करत तिच्यावर 29 जणांनी बलात्कार केल्याची माहिती सध्या समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु केला असून आणखी काही आरोपींची नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे.

घटना ऐकून पोलीसही हैराण

या घटनेमुळे डोंबिवली ग्रामीण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. डोंबिवली पूर्वेत राहणाऱ्या एका 15 वर्षीय मुलीने मानपाडा पोलीस ठाण्यात आपल्यावर 8 महिन्यांपासून लैंगिक अत्याचार सुरु असल्याबाबत तक्रार नोंदवली. पोलिसांनी पीडित तरुणीला विश्वासात घेत चौकशी सुरु केली. या चौकशीमध्ये जी माहिती समोर आली ते ऐकून पोलीस हैराण झाले.

आरोपींनी पिडितेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केला

जानेवारी महिन्यात पीडित तरुणीवर तिच्या प्रियकराने बलात्कार करत तिचा व्हिडियो काढला होता. हा व्हिडियो या तरुणाने आपल्या मित्रांना दाखवला. या व्हिडियोच्या आधारे आतापर्यंत 29 जणांनी या पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले. बदलापूर, रबाळे, मुरबाड आणि डोंबिवलीत वेगवेगल्या ठिकाणी तिला घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केला गेला. मानपाडा पोलिसांनी आतापर्यंत 23 जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यामध्ये दोन आरोपी हे अल्पवयीन आहेत. 21 आरोपींच्या अटकेनंतर पोलीस सहा आरोपींच्या शोधात आहेत.

शालिनी ठाकरे आक्रमक

दरम्यान, या घटनेवर मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. “डोंबिवलीमधील सामूहिक बलात्काराची घटना अंगावर काटा आणणारी आहे. दिल्ली यूपीपेक्षा महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी नाही हे सिद्ध होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अजून काय घडणे अपेक्षित आहे?”, असा सवाल शालिनी ठाकरे यांनी ट्विटरवर केला आहे. 

हेही वाचा :

हेल्थकेअरच्या नावाखाली फ्रॉड! औरंगाबादरांची लाखोंची फसवणूक, नागरिकांनी पुढे येऊन तक्रार करण्याचे आवाहन

बॉयफ्रेण्डकडून बलात्काराचं व्हिडीओ शूट, 14 वर्षीय मुलीवर 31 जणांचा गँगरेप, डोंबिवलीत खळबळ

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI