AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vasai Crime : आईने कुणाला मोबाईलवरुन मॅसेज केला, संतापलेल्या अल्पवयीन मुलाने जे केले त्याने वसई हादरली !

वसईत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे वसईत खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलाने स्वतःच्या आईसोबत जे केले ते भयंकर होते.

Vasai Crime : आईने कुणाला मोबाईलवरुन मॅसेज केला, संतापलेल्या अल्पवयीन मुलाने जे केले त्याने वसई हादरली !
मॅसेज केला म्हणून मुलाने आईला संपवलेImage Credit source: Social Media
| Updated on: Aug 22, 2023 | 1:17 PM
Share

वसई / 22 ऑगस्ट 2023 : वसईत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. क्षुल्लक कारणातून अल्पवयीन मुलाने आईचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना वसई टाऊनशीपच्या पारोळे भागात घडली. रविवारी रात्री ही भयंकर घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोनाली गोगरा असे मयत महिलेचे नाव आहे. घटना घडली तेव्हा घरी आई आणि मुलगा दोघेच होते. याबाबात मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास आला आहे. मात्र अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नाही. पोलिसांनी हत्येत वापरलेले हत्यारही जप्त केले आहे.

काय घडलं नेमकं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री अल्पवयीन मुलगा जेवत होता. त्याचवेळी त्याची आई मोबाईलवरुन कुणाला तरी मॅसेज करत होती. आईला मॅसेज करताना पाहून मुलगा चिडला. त्यानंतर त्याने कुऱ्हाड घेतली आणि आईवर वार केले. यात महिला गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ भिवंडीतील इंदिरा गांधी मेमोरियल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

मायलेकात नेहमी वाद व्हायचे

आरोपी मुलाला आईच्या चारित्र्यावर संशय होताय यामुळे मायलेकात नेहमी वाद व्हायचे. घटनेच्या दिवशीही असाच वाद झाला. त्या घरचे सदस्यही घरी नव्हते. क्षुल्लक कारणातून मुलाने जे केले त्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मांडवी पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.