Mumbai Heroine Seized : मुंबईला ड्रग्जच्या विळख्यात ढकलण्याचं षडयंत्र? बोरीवलीतून 50 लाखांच्या हेरॉईनसह गर्भवती महिलेला अटक

बोरिवली पश्चिमेकडील सेंट फ्रान्सिस शाळेजवळ एक महिला ड्रग्ज पुरवण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार एमएचबी पोलिसांच्या पथकाने शाळेजवळ सापळा रचला. ठरल्या वेळेत मुस्कान कनोजिया ही महिला ड्रग्ज घेऊन आली. त्यानंतर पोलिस पथकाने महिलेवर पाळत ठेवून तिला रंगेहाथ पकडले.

Mumbai Heroine Seized : मुंबईला ड्रग्जच्या विळख्यात ढकलण्याचं षडयंत्र? बोरीवलीतून 50 लाखांच्या हेरॉईनसह गर्भवती महिलेला अटक
बोरीवलीतून 50 लाखांच्या हेरॉईनसह गर्भवती महिलेला अटक
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 25, 2022 | 4:41 PM

मुंबई : मुंबईच्या एमएचबी पोलिसांनी बोरिवली परिसरातून एका गर्भवती महिलेला 50 लाख 75 हजार किंमतीच्या हेरॉईन (Heroin)सह रंगेहाथ अटक (Arrest) केली आहे. मुस्कान दीपक कनोजिया (23) असे अटक करण्याता आलेल्या महिलेचे नाव आहे. महिलेकडून 345 ग्रॅम ड्रग्ज पोलिसांनी हस्तगत केले आहे. पोलिसांना मुस्कान कनोजिया हिला अटक करत तिच्या साथीदारांचा शोध सुरु केला आहे. सध्या महिलेची प्रकृती बिघडल्याने महिलेला पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतरच तिची सखोल चौकशी करण्यात येईल. (A pregnant woman was arrested in Borivali Mumbai with drugs)

सेंट फ्रान्सिस शाळेजवळ सापळा रचून आरोपीला अटक

बोरिवली पश्चिमेकडील सेंट फ्रान्सिस शाळेजवळ एक महिला ड्रग्ज पुरवण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार एमएचबी पोलिसांच्या पथकाने शाळेजवळ सापळा रचला. ठरल्या वेळेत मुस्कान कनोजिया ही महिला ड्रग्ज घेऊन आली. त्यानंतर पोलिस पथकाने महिलेवर पाळत ठेवून तिला रंगेहाथ पकडले. तिच्याकडून 50 लाख 75 हजार रुपयांचे 345 ग्रॅम ड्रग्ज जप्त केले. एमएचबी पोलिसांनी महिलेला अटक केले आहे. मात्र तिची तब्येत बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुढील चौकशी करण्यात येईल. महिलेच्या अन्य साथीदारांचाही शोध घेत असल्याचे एमएचबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी सांगितले. (A pregnant woman was arrested in Borivali Mumbai with drugs)

इतर बातम्या

Pune crime : चाकूचा धाक दाखवून पुण्याच्या उरुळी कांचनमध्ये दागिने पळवले; झटापटीत महिला जखमी

Aurangabad | औरंगाबादेत भोंग्यांवरून पहिला गुन्हा दाखल, सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काय घडला प्रकार?