Anil Deshmukh : अनिल देशमुख यांचं परमबीर सिंग यांच्या विरोधात प्रतिज्ञापत्र चांदीवाल आयोगाकडे सादर

| Updated on: Jan 25, 2022 | 4:31 PM

आपल्याला महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाने तयार केलेली कागदपत्रे आणि नोटींग हव्या होत्या. त्यांनी काही कागदपत्रे गोळा केली आणि मंत्रालयात अधिकाऱ्यांसमोर हजर केले. संपूर्ण सत्य कागदपत्रांमध्ये आहे ज्यामुळे संपूर्ण सत्य समोर येईल, असे अनिल देशमुख यांचे प्रतिनिधित्व करणारे अॅड गिरीश कुलकर्णी यांनी आयोगाला सांगितले.

Anil Deshmukh : अनिल देशमुख यांचं परमबीर सिंग यांच्या विरोधात प्रतिज्ञापत्र चांदीवाल आयोगाकडे सादर
अनिल देशमुख
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : अँटिलिया बॉम्ब प्रकरणाबाबत एटीएसच्या नोटींगमध्ये परम बीर सिंह(Parambir Sing) यांच्याबद्दल “परम सत्य” म्हटले आहे, असं आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांनी एका प्रतिज्ञाद्वारे न्या.चांदीवाल आयोगाला सांगण्याचा प्रयत्न केला. तसे एक प्रतिज्ञापत्र(Affidavit) त्यांनी सादर केलं. मात्र नंतर या प्रतिज्ञापत्रात त्यांनी बदल केला. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एकल सदस्य न्यायमूर्ती केयू चांदीवाल आयोगाला “परम सत्य” असलेले प्रतिज्ञापत्र सुपूर्द केले. फेब्रुवारी 2021 च्या अँटिलिया बॉम्ब प्रकरण आणि त्यानंतर उद्योगपती मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांनी आपल्या ब्रीफिंगमध्ये महाराष्ट्र सरकारची दिशाभूल केली होती, असे देशमुख म्हणाले. (Anil Deshmukh’s affidavit against Parambir Singh submitted to Chandiwal Commission)

आपल्याला महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाने तयार केलेली कागदपत्रे आणि नोटींग हव्या होत्या. त्यांनी काही कागदपत्रे गोळा केली आणि मंत्रालयात अधिकाऱ्यांसमोर हजर केले. संपूर्ण सत्य कागदपत्रांमध्ये आहे ज्यामुळे संपूर्ण सत्य समोर येईल, असे अनिल देशमुख यांचे प्रतिनिधित्व करणारे अॅड गिरीश कुलकर्णी यांनी आयोगाला सांगितले. “मी गृहमंत्री असताना एटीएसने गोळा केलेली काही कागदपत्रे आम्हाला दिली होती. सिंग कशी दिशाभूल करत होते, हे कधीतरी रेकॉर्डवर आणले पाहिजे. म्हणून मी आज आयोगाला हे सांगत आहे, साक्षीदार म्हणून उभे असताना अनिल देशमुख यांनी आयोगाला सांगितले.

एटीएसने अँटिलिया प्रकरणातील महत्वाच्या बाबींची माहिती सरकारला दिली

देशमुख यांच्या अर्जात असं म्हटलं होतं की, एटीएसने अँटिलिया प्रकरणाचा तपास हाती घेतल्यानंतर,”काही महत्त्वाच्या आणि निर्णायक बाबी समोर आल्या आहेत. ज्याची माहिती एटीएसने महाराष्ट्र सरकारला दिली होती. एटीएसच्या ब्रीफिंग दरम्यान जी तथ्ये समोर आली होती, त्यात वस्तुस्थिती उघड होईल. परमबीर सिंग यांचा “परम-सत्य” जो या आयोगासमोर तोंडी ठेवण्याचा माझा मानस आहे.” आयोगाने जो अर्ज स्वीकारला नाही. त्यात पुढे असे म्हटले आहे की, “एटीएसच्या तपासामुळे महाराष्ट्र सरकारने परमबीर सिंग यांची होमगार्डच्या महासंचालक या पदावर बदली केली. त्यानंतर त्यांनी 20 मार्च 2021 रोजी संपूर्ण श्रेय देऊन दुर्भावनापूर्ण पत्र लिहिले. बोगस आरोप, बदला म्हणून जे या आयोगाच्या चौकशीच्या कक्षेत आहे.”

अॅड. योगेश नायडू यांचा अर्जाला विरोध

परमबीर सिंगचे प्रतिनिधित्व करणारे वकील अनुकुल सेठ यांनी देशमुख यांच्या प्रतिज्ञापत्रात लिहिलेल्या काही परिच्छेदांवर आक्षेप घेतला आणि न्यायमूर्ती चांदीवाल यांनी कुलकर्णी यांना परमबीर सिंग यांच्यावर विविध आरोप लावणारा अर्ज बदलण्यास सांगितले. त्यानंतर “मला या सर्व पॅरासह नव्हे तर स्पष्ट शब्दांत अर्ज द्या”, न्यायमूर्ती चांदीवाल यांनी सांगितले. सेठ आणि वाझे यांचे वकील योगेश नायडू यांनी या अर्जाला विरोध केला. मात्र देशमुख आणि इतरांनी वाझे यांच्या अर्जाला हरकत न दिल्याने त्यांनी ते मान्य केले.

पुढील सुनावणी 3 फेब्रुवारी रोजी होणार

न्यायमूर्ती चांदीवाल यांनी आयोगाच्या रजिस्ट्रार यांना एका आठवड्यात आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना पत्र लिहिण्यास सांगितले. आवश्यकतेनुसार संबंधित साक्षीदारांना परत बोलावण्याचा संबंधित पक्षांचा अधिकार खुला ठेवण्यात आला आहे. आयोगाची पुढील सुनावणी आता 3 फेब्रुवारी रोजी होणार आहे. (Anil Deshmukh’s affidavit against Parambir Singh submitted to Chandiwal Commission)

इतर बातम्या

Kalyan Crime : कल्याण क्राईम ब्रांचने उधळला हत्येच्या गुन्ह्यातील आरोपीला बोगस जामीन मिळवून देण्याचा प्रयत्न

Pune cyber crime | पुण्यात आता ‘जॉब फ्रॉडचं’ जाळं, एका वर्षात अनेक तरुणांना घातला तब्बल 87 कोटींचा गंडा