Kalyan Crime : कल्याण क्राईम ब्रांचने उधळला हत्येच्या गुन्ह्यातील आरोपीला बोगस जामीन मिळवून देण्याचा प्रयत्न

बोगस जामिनदारांचे वकील रफीक शेख हे सर्व कागदपत्रे व्यवस्थित असल्याचा दावा पोलिसांसमोर करीत होते. मात्र पोलिसांना जामिनदाराच्या हालचालीविषयी संशय होता. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता पोलिसांचा संशय खरा ठरला.

Kalyan Crime : कल्याण क्राईम ब्रांचने उधळला हत्येच्या गुन्ह्यातील आरोपीला बोगस जामीन मिळवून देण्याचा प्रयत्न
कल्याण क्राईम ब्रांचने उधळला हत्येच्या गुन्ह्यातील आरोपीला बोगस जामीन मिळवून देण्याचा प्रयत्न
Follow us
| Updated on: Jan 25, 2022 | 4:16 PM

कल्याण : रेल्वेत हत्या केलेल्या आरोपीला बोगस कागदपत्रच्या आधारावर जामीन मिळवून देण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका वकिलासह 5 जणांना कल्याण क्राईम ब्रांच(Kalyan Crime Branch) पोलिसांनी कल्याण कोर्ट(Kalyan Court) परिसरातून अटक केली आहे. न्यायालयाने या सर्व आरोपींना पोलीस कोठडी(POlice Custody) सुनावली असून बोगस कागदपत्रंच्या आधारे जामीन मिळवून देणारे एक मोठ रॅकेट सक्रीय असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणात वकील रफीक शेख, आरोपीचे वडील हबीब हाश्मी, बोगस जामिनदार संतोष मोर्या, जयपाल जोगीरी आणि कागदपत्र तयार करून देणारा चंद्रकांत खामकर यांना अटक करण्यात आली. आज दुपारी या सर्व आरोपींना कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने या सगळ्या आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (Kalyan Crime Branch thwarts attempt to get bogus bail for murder accused)

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले

कल्याण क्राईम ब्रांचचे अधिकारी मोहन खंडारे यांना 24 जानेवारी रोजी एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीला जमीन मिळवून देण्याचा प्रयत्न सुरु आहे, अशी माहिती मिळाली होती. मात्र आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी बोगस जामीनदार कोर्टासमोर हजर केले जाणार आहेत. यासाठी बोगस कागदपत्र तयार करण्यात आली आहेत. मिळालेली माहिती खंडारे यांनी क्राईम ब्रांचचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक किशोर शिरसाट यांना दिली. शिरसाट यांनी पोलीस अधिकारी भूषण दायमा, मोहन कळमकर, विनोद चन्ने, मोहन खंडारे, पोलीस अधिकारी फालक, मिथुन राठोड, राहुल इसी आणि अन्य पोलिसांचे एक पथक तयार केले. हे पथक चौकशीकरीता पाठविले. पोलीस पथकाने मिळालेल्या माहितीनुसार संशयित बोगस जामिनदारांना ताब्यात घेतले.

अटक केलेल्या पाच जणांना दोन दिवसाची पोलीस कोठडी

बोगस जामिनदारांचे वकील रफीक शेख हे सर्व कागदपत्रे व्यवस्थित असल्याचा दावा पोलिसांसमोर करीत होते. मात्र पोलिसांना जामिनदाराच्या हालचालीविषयी संशय होता. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता पोलिसांचा संशय खरा ठरला. बोगस कागदपत्रांच्या आधारे डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्याकडून अटक करण्यात आलेल्या एका मर्डरच्या आरोपीला बोगस जामिनदार तयार करण्यात आले होते. या सर्व आरोपींना अटक करुन पुढील तपास सुरु आाहे. या प्रकरणात एक मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने पुढील तपास सुरु आहे, असे वरिष्ठ पोलीस निरिक्षक किशोर शिरसाट यांनी सांगितले. (Kalyan Crime Branch thwarts attempt to get bogus bail for murder accused)

इतर बातम्या

Pune cyber crime | पुण्यात आता ‘जॉब फ्रॉडचं’ जाळं, एका वर्षात अनेक तरुणांना घातला तब्बल 87 कोटींचा गंडा

Accident | 48 तासांत रस्ते अपघातात तब्बल 16 मृत्यू, वर्ध्यापाठोपाठ मुंबई-पुणे जुन्या हायेववरही अपघात!

Non Stop LIVE Update
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.