प्रवासी रिक्षात बसला, चालकानेच निर्जनस्थळी मोबाईल-पैसे हिसकावले, थरार सीसीटीव्हीत कैद, पोलिसांनी कसं पकडलं?

| Updated on: Aug 05, 2021 | 12:20 AM

एक प्रवासी रिक्षाच्या प्रतिक्षेत उभा होता, रिक्षा आली, त्या रिक्षात प्रवासी बसला. रिक्षा थोड्या अंतरावर गेल्यावर रिक्षा चालक आणि रिक्षात बसलेल्या सहप्रवाशाने त्या प्रवाशाकडील महागडा मोबाईल आणि रोख रक्कम हिसकावली

प्रवासी रिक्षात बसला, चालकानेच निर्जनस्थळी मोबाईल-पैसे हिसकावले, थरार सीसीटीव्हीत कैद, पोलिसांनी कसं पकडलं?
प्रवासी रिक्षात बसला, चालकानेच निर्जनस्थळी मोबाईल-पैसे हिसकावले, थरार सीसीटीव्हीत कैद, पोलिसांनी कसं पकडलं?
Follow us on

कल्याण (ठाणे) : एक प्रवासी रिक्षाच्या प्रतिक्षेत उभा होता, रिक्षा आली, त्या रिक्षात प्रवासी बसला. रिक्षा थोड्या अंतरावर गेल्यावर रिक्षा चालक आणि रिक्षात बसलेल्या सहप्रवाशाने त्या प्रवाशाकडील महागडा मोबाईल आणि रोख रक्कम हिसकावली. नंतर त्यांनी प्रवाशाला रिक्षाच्याबाहेर ढकलून दिलं. मात्र, केडीएमसीच्या स्मार्ट सिटी प्रकल्पातील सीसीटीव्हीत ही रिक्षा कैद झाली. रिक्षाचा हूडचा रंग युनिक असल्याने पोलिसांनी 16 तासाच्या आत प्रवाशाला लुटणाऱ्या रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदारास बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं काय घडलं?

आकाश जैयस्वाल नावाचा एक कारपेंटर कल्याण पश्चिमेत त्याचे काम संपवून निक्कीनगर परिसरातील चौकात उभा होता. रात्रीचे साडेआठ वाजले होते. त्याला कल्याण स्टेशनला जायचे होते. तो रिक्षाच्या प्रतिक्षेत होता. यावेळी एक रिक्षा त्याच्यासमोर आली. रिक्षा चालकाने आकाशला रेल्वे स्टेशनला जायचे आहे का? असं विचारलं. त्यावेळी आकाशने रिक्षा चालकास होकार दिला.

आकाश रिक्षात बसला. या रिक्षात आधीच एक प्रवासी बसला होता. रिक्षा थोड्या अंतरावर गेली तेव्हा रिक्षा चालकाने रिक्षा रस्त्याच्या एका बाजूला निजर्नस्थळी उभी केली. त्यानंतर आकाश जवळील महागडा मोबाईल आणि रोकड घेऊन रिक्षा चालक आणि सहप्रवासी पसार झाले. मात्र कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत लावण्यात आलेल्या सीटीटीव्हीत ही रिक्षा कैद झाली होती.

पोलिसांनी आरोपींना बेड्या कशा ठोकल्या?

रिक्षाचा पडदा हा निळ्या रंगाचा होता. कल्याण डोंबिवलीत अशी रिक्षा कधी दिसली नाही. कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी योगेश गायकर यांच्या पथकाने या रिक्षाचा शोध सुरु केला. अखेर ही रिक्षा सापडली. 16 तासाच्या आत आकाश जायस्वालला लुटणाऱ्या रिक्षाचालक अक्षय कांबळे आणि सहप्रवासी रशीद शेख या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. हे दोघे कल्याण पूर्व भागातील श्रीकृष्ण नगर परिसरात राहणारे आहेत. प्रवाशाला लुटणाऱ्या या दोघांचे अखेर बिंग फुटले आहे.

हेही वाचा :

शेताच्या बांधावर खोदकाम, अचानक वाद उफाळला, दोन शेतकरी आमनेसामने, थेट गोळीबार, लातूरमधील भयानक घटना

पोलीस असल्याचं भासवलं, एसटी थांबवली, दमदाटी करत चौघांना खाली उतरलं, सिनेस्टाईल 1 कोटी रुपये पळवले