ते अचानक भरदुपारी घरात शिरले, मारहाण आणि शिवीगाळ करु लागले, तुंबळ हाणामारी, डोंबिवलीत खळबळ

| Updated on: Sep 04, 2021 | 12:07 AM

जागेच्या वादातून एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना डोंबिवलीत समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे यामध्ये लहान मुलांना आणि महिलांना सुद्धा मारहाण करण्यात आली आहे.

ते अचानक भरदुपारी घरात शिरले, मारहाण आणि शिवीगाळ करु लागले, तुंबळ हाणामारी, डोंबिवलीत खळबळ
Follow us on

डोंबिवली : जागेच्या वादातून एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना डोंबिवलीत समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे यामध्ये लहान मुलांना आणि महिलांना सुद्धा मारहाण करण्यात आली आहे. एवढेच नाही तर घरात सर्व वस्तूंची तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. संबंधित घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हारल झाले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

डोंबिवली पूर्वेतील पागड्याचा पाडा गावात शुक्रवारी (3 सप्टेंबर) अडीच वाजेच्या सुमारास एका घरात काही लोक घुसले. त्यांनी काही कारण नसताना घरातील लोकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण करणारे इसम जेव्हा घरात शिरले तेव्हा घरात अरुण काळोखे, त्यांची पत्नी आणि त्यांचा लहान मुलागाही होता. आरोपींनी मागचा-पुढचा कोणताही विचार न करता तिघांना बेदम मारहाण केली. या मारहाणीच्या व्हिडिओ देखील समोर आला आहे. एवढेच नाही तर हल्ला करणाऱ्या लोकांनी घरामध्ये तोडफोड सुद्धा केली आहे.

वादामागील कारण नेमकं काय?

दरम्यान, जागेच्या वादातून ही हाणामारी झाली असल्याची माहिती अरुण काळोखे यांनी दिली आहे. अनेक दिवसांपासून जागेवरुन वाद सुरु आहेत. हा वाद शुक्रवारी विकोपाला गेला. डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. तसेच या घटनेत दुसऱ्या गटातील एक महिला सुद्धा जखमी झाली आहे. सागर फराळ आणि त्यांच्या नातेवाईकांनी हा हल्ला केल्याचे समोर आले आहे. तसेच ज्या कुटुंबाला मारहाण झाली आहे ते कुटुंब दहशतीखाली आहे.

बीडमध्ये दोन गटांमधील हाणामारीत तरुणाचा मृत्यू

दरम्यान दोन दिवसांपूर्वी बीडमध्ये देखील अशीच काहीशी घटना समोर आली होती. दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती. या हाणामारीत एका युवकाचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे या युवकाच्या घरात आठ दिवसांपूर्वीच एका चिमुकलीचं आगमन झालं होतं. त्याला कन्यारत्न प्राप्त झालं होतं. त्यामुळे त्याच्या घरात आनंद आणि उत्साहाचं वातावरण होतं. पण या आनंदावर विरझन पडलं. कारण त्यांच्या घरासमोर झालेल्या हाणामारीत त्याचा मृत्यू झाला. डुकराच्या शिकारीवरुन हा वाद उफाळला होता. मृतक तरुणाचं नाव रवी धोत्रे असं आहे.

मृतक रवी धोत्रे यांच्या कुटुंबाचा वराह पालनाचा व्यवसाय आहे. वडारवाडा भागातील सर्व वराह धोत्रे कुटुंबाचीच आहेत. दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या शेजारी रस्त्याच्या कडेला झोपडी टाकून राहणाऱ्या सिकलकरी समाजाच्या लोकांचाही वराह पालनाचा व्यवसाय आहे. त्यामुळे धोत्रे कुटुंब आणि त्यांच्यात कदाचित याआधी देखील वाद उफाळला असावा. मात्र, यावेळी झालेला वाद प्रचंड टोकाला गेला आणि एका तरुणाचा मृत्यू झाला.

हेही वाचा :

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून महिला सरपंचाला मारहाण, पुणे ग्रामीण हादरलं

जंगलात 11 वर्षीय मुलाच्या मृतदेहाचे तब्बल 11 तुकडे, हत्येचं गूढ उकललं, सत्य समोर येताच पोलीसही चक्रावले