डिसी अवंती स्पोर्ट्स कार घोटाळा, मालक दिलीप छाब्रियांनंतर त्यांच्या मुलालाही अटक, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

| Updated on: Sep 25, 2021 | 12:08 PM

मुंबई पोलीसांच्या सीआययु युनिटने कार डिझायनर दिलीप छाब्रिया (Dilip Chhabria) यांच्या मुलाला अटक केली आहे. प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा याने व्हॅनिटी व्हॅन बनवून घेण्यासाठी दिलेल्या पैशांच्या अपहार प्रकरणी ही अटक केली आहे. गेल्यावर्षी सचिन वाझे सीआययु पथकाचे प्रमुख असताना दिलीप छाब्रिया यांना अटक करण्यात आली होती.

डिसी अवंती स्पोर्ट्स कार घोटाळा, मालक दिलीप छाब्रियांनंतर त्यांच्या मुलालाही अटक, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
Dilip Chhabria
Follow us on

मुंबई : मुंबई पोलीसांच्या सीआययु युनिटने कार डिझायनर दिलीप छाब्रिया (Dilip Chhabria) यांच्या मुलाला अटक केली आहे. प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा याने व्हॅनिटी व्हॅन बनवून घेण्यासाठी दिलेल्या पैशांच्या अपहार प्रकरणी ही अटक केली आहे. गेल्यावर्षी सचिन वाझे सीआययु पथकाचे प्रमुख असताना दिलीप छाब्रिया यांना अटक करण्यात आली होती. छाब्रिया यांच्यावर डिसी अवंती स्पोर्ट्स कारमध्ये (DC Avanti sports car) घोटाळा केल्याचा आरोप होता. याचवेळी कपिल शर्मा यानेही सीआययु पथकात त्याची फसवणूक झाल्याची तक्रार दिली होती. कपिल शर्मा याने जो व्यवहार छाब्रिया यांच्यासोबत केला होता, तो छाब्रिया यांच्या मुलाच्या खात्यावर झाला होता, त्यात त्याने अपहार केला असा आरोप करण्यात आला आहे.

गतवर्षी मुंबई पोलिसांनी डिझायनर कार खरेदी, विक्री आणि फायनान्स करुन लोकांची कोट्यावधींची फसवणूक केल्याचा गुन्हा उघडकीस आणला होता. हे रॅकेट देशातील अनेक राज्यात पसरल्याचा अंदाज वर्वण्यात आला होता. या फसवणूकच्या गुन्ह्यात प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांना अटक करण्यात आली होती. दिलीप छाब्रिया या डिझाइन्स प्राव्हेट लिमीटेड या कंपनीचे मालक आहेत.

पोलिसांनी कसा रचला सापळा?

नरीमन पॉईंट येथील ट्रायडंट हॉटेलजवळ डी. सी. अवंती गाडी येणार आहे. या गाडीचा नंबर बोगस आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या टीमने गतवर्षी 17 डिसेंबरला सापळा रचला होता. मात्र, त्या दिवशी ही गाडी आली नाही. नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 18 डिसेंबरला ताज हॉटेल, कुलाबा या ठिकाणी पुन्हा सापळा रचण्यात आला. त्यादिवशी ही अलिशान गाडी तिथे आली.

त्यानंतर पोलिसांनी ही डिझायनर कार ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. ही गाडी चालवणाऱ्या मालकाची विचारपूस केली असता, त्या मालकाने गाडीचे पेपर पोलिसांना दिले. सुदैवाने हे पेपर खरे असून चेन्नईच्या पत्त्यावर रजिस्टर होते. मात्र पुढील तपासात असे निदर्शनास आले की, त्याच चेसी आणि इंजन नंबरवर दुसरी गाडी हरियाणामध्ये रजिस्टर करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डी. सी. अवंती गाडी ही दिलीप छाब्रिया डिझाइन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून बनवण्यात आली होती. 2016 मध्ये या गाडीचे लॉन्चिंग करण्यात आलं होतं. 2015 मध्ये या गाडीला ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया यांचं क्लिअरन्स सर्टिफिकेट मिळालं होतं. त्यानंतर या गाडीची लॉन्चिंग करण्यात आली होती. दिलीप छाब्रिया डिझाइन्स प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना 14 जून 1993मध्ये झाली होती. पुण्यात असलेल्या दिलीप छाब्रिया डिझाइन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या कारखान्यात डी सी अवंती कार बनवल्या जात होत्या.

कपिल शर्माचीही फसवणूक

दिलीप छाब्रियांविरोधात अभिनेता कपिल शर्मा मुंबई क्राइम ब्रँचच्या कार्यालयात पोहोचला होता. येथे तो कार डिझायनर दिलीप छाब्रिया (Dilip Chhabria) विरोधात जबाब देण्यासाठी गेला होता. कपिलने दिलीप छाब्रियांकडे व्हॅनिटी व्हॅन तयार करण्यासाठी पैसे दिले होते, पण त्यांला व्हॅनिटी व्हॅन मिळाली नाही. ज्यामुळे कपिल शर्माने मुंबई पोलिसांत दिलीप छाब्रिया विरोधात फिर्याद दिली होती.

हेही वाचा :

Mithila Palkar : मिथिला पालकरचा सुंदर आणि निरागस अंदाज; चाहते म्हणाले, ‘श्री कृष्णा जसे राधावर निस्वार्थ प्रेम करायचे तसं…’

‘रील लाईफमधून बाहेर पडून रियल लाईफमध्ये लक्ष द्या…’, शर्लिन चोप्राचा शिल्पा शेट्टीवर हल्लाबोल!