‘रील लाईफमधून बाहेर पडून रियल लाईफमध्ये लक्ष द्या…’, शर्लिन चोप्राचा शिल्पा शेट्टीवर हल्लाबोल!

अश्लील चित्रपट प्रकरणात शर्लिन चोप्राचे (Sherlyn Chopra ) नाव पुढे आल्यापासून तिने आपल्या बचावात बरेच काही सांगितले आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा (Raj Kundara) यांच्या विरोधात वक्तव्य करण्यापासून ते शिल्पा शेट्टीला (Shilpa Shetty) लक्ष्य करण्यापर्यंत शर्लिनने अनेक वक्तव्ये केली आहेत.

‘रील लाईफमधून बाहेर पडून रियल लाईफमध्ये लक्ष द्या...’, शर्लिन चोप्राचा शिल्पा शेट्टीवर हल्लाबोल!
Sherlyn Chopra

मुंबई : अश्लील चित्रपट प्रकरणात शर्लिन चोप्राचे (Sherlyn Chopra ) नाव पुढे आल्यापासून तिने आपल्या बचावात बरेच काही सांगितले आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा (Raj Kundara) यांच्या विरोधात वक्तव्य करण्यापासून ते शिल्पा शेट्टीला (Shilpa Shetty) लक्ष्य करण्यापर्यंत शर्लिनने अनेक वक्तव्ये केली आहेत. पुन्हा एकदा शर्लिनने शिल्पाला रील लाईफच्या जगातून बाहेर पडून प्रत्यक्ष आयुष्यात जगण्याचा सल्ला दिला आहे. तिने ट्विट करून शिल्पाला दोन गोष्टी सांगितल्या आहेत.

शर्लिनने लिहिले की, ‘तुम्ही टीव्हीवर त्या कलाकारांना साष्टांग दंडवत करता ज्यांच्या कलेवर तुम्ही प्रभावित आहात… कृपया, रील लाईफमधून बाहेर पडा आणि वास्तविक जगात जा आणि पीडितांबद्दल थोडी सहानुभूती दाखवा. माझ्यावर विश्वास ठेवा, संपूर्ण जग तुमच्यापुढे नतमस्तक होईल.’ या ट्विटसह शर्लिनने तिचा व्हिडीओही शेअर केला आहे, ज्यात ती शिल्पाला तिचे नाव न घेता टोमणे मारताना दिसली. ‘स्टेजवर साष्टांग दंडवत घालणे, राणी लक्ष्मीबाईंबद्दल बोलणे खूप सोपे आहे. आधी तुम्ही जमिनीवर उतरा, पीडित महिला, मुलांसाठी काहीतरी करा, तुमच्या बंगल्यातून बाहेर पडा, अश्लील जगातून बाहेर पडा आणि काहीतरी करा…’

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, शिल्पा शेट्टीने तिच्या रिअॅलिटी शो सुपर डान्सर चॅप्टर 4 मध्ये स्पर्धकांच्या कामगिरीचे अनेक वेळा कौतुक केले आहे. शर्लिननेही आपल्या ट्विटमध्ये असेच म्हटले आहे.

पाहा व्हिडीओ :

शर्लिनने आधीही शिल्पाकडे बोट दाखवले!

काही काळापूर्वी, शर्लिनने शिल्पा शेट्टीने राज कुंद्राबद्दल केलेल्या वक्तव्यावर अभिनेत्रीची खिल्ली उडवली होती. यावेळी शर्लिनने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. शर्लिनने व्हिडीओमध्ये म्हटले की, ‘काही मीडिया रिपोर्टनुसार, दीदी (शिल्पा) म्हणते की तिला तिचा पतीच्या या कामांबद्दल कल्पना नव्हती. शिवाय, दीदी असेही म्हणतात की, तिला तिच्या पतीच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेचे स्त्रोत देखील माहित नव्हते. आता तुम्ही स्वतःच अंदाज लावू शकता की, या प्रकरणात कितपत सत्य आहे.’

राज कुंद्रा प्रकरणी शर्लिनचे नाव

राज कुंद्रावर अश्लील चित्रपट बनवल्याचा आणि अॅपद्वारे प्रदर्शित केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात, नवीन कनेक्शन समोर येत आहेत. या प्रकरणात शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांचे कनेक्शनही राज कुंद्राबरोबर असल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्र सायबरच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अभिनेत्री शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांची नावे आरोपी म्हणून आली आहेत. त्यांचा जबाब महाराष्ट्र सायबरने नोंदवला आहे. या दोन्ही अभिनेत्रींनी कुंद्रावर आरोप केले होते. राज कुंद्रा यांना गेल्या वर्षी कोर्टाकडून अंतरिम जामीन मिळाला होता आणि जामीन अर्जावर अंतिम सुनावणी या महिन्याच्या शेवटी होणार होती.

शर्लिन चोप्राचा राज कुंद्राबरोबरचा करार

सूत्रांनी सांगितले की, शर्लिन चोप्राचा राज कुंद्राच्या फर्म आर्म्सप्राइम मीडियाबरोबर करार होता. हा करार भारताबाहेर कंपन्यांच्या काही अ‍ॅप्ससाठी अश्लील सामग्री पुरवण्याचा होता. तिचे माजी वकील चरणजित चंद्रपाल यांच्या म्हणण्यानुसार शर्लिन तिचा अ‍ॅप सेमी पॉर्न पद्धतीने चालवत असे. तिचे हे पार्टटाईम काम फार चांगले चालले नव्हते आणि काही काळानंतर शार्लिनला कुंद्राने स्पॉट केले. राज कुंद्राने शर्लिन चोप्राला सांगितले की, तिला या बदल्यात 50% नफा मिळेल. राज यांनी स्वत: या करारावर सही केली होती.

शर्लिनने दाखल केली तक्रार

यातून तिने जून 2019 ते जुलै 2020 दरम्यान चांगली कमाई केली होती. मात्र, शर्लिनला समजले की तिला या करारानुसार पैसे मिळत नाहीयत आणि म्हणूनच वर्षभरानंतर तिने हा करार संपुष्टात आणण्यास सांगितले. शर्लिनने पुन्हा तिचे स्वतःचे अ‍ॅप बनवले आणि काही महिन्यांपर्यंत हे काम केले. परंतु 2020 च्या ऑगस्टमध्ये तिच्या कंटेंटची पायरसी होत होती आणि तिने स्वत: याबद्दल तक्रार दिली होती. 2021 फेब्रुवारीनंतर तिने राज कुंद्राने तिला या इंडस्ट्रीमध्ये कसे ढकलले याबद्दल एक विधान केले होते.

हेही वाचा :

Drugs Case | ‘हे समाजाच्या दृष्टीने घातक…’, हर्ष आणि भारतीच्या जामीनावर NCB नाराज!

Mouni Roy : मौनी रॉयने ब्लॅक ड्रेसमध्ये दाखवला बोल्ड अवतार, अ‍ॅमस्टरडॅममध्ये करतेय धमाल

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI