Mumbai Fraud : कर्ज देण्याच्या बहाण्याने लोकांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

आतापर्यंत तपासामध्ये आरोपींनी 13 पेक्षा जास्त लोकांची लाखो रुपयांपर्यंत फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी अटक होण्याची शक्यता आहे. आरोपी लोकांना फोन करून कर्जा संदर्भात माहिती द्यायचे. शिवाय पीडित लोकांकडून कागदपत्र मागून घ्यायचे आणि त्यानंतर इन्शुरन्स त्याचबरोबर प्रोसेसिंग फीच्या नावाखाली पैसे उकळायचे.

Mumbai Fraud : कर्ज देण्याच्या बहाण्याने लोकांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
राजलक्ष्मी इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये फ्रॉड ट्रेडिंगImage Credit source: Wikipedia
Follow us
| Updated on: Mar 31, 2022 | 12:40 AM

मुंबई : मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने घाटकोपर परिसरात मोठी कारवाई करत कर्ज देण्याच्या आमिषाने लोकांची फसवणूक (Fraud) करणाऱ्या एका रॅकेट (Racket)चा पर्दाफाश केला आहे. घाटकोपर पूर्वेकडे गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने कारवाई करत एका इमारतीत सुरू असलेल्या फेक कॉल सेंटरचा पर्दाफाश करत एकूण चार आरोपींना अटक केलेली आहे. चारही आरोपी हे बारावी ते पदवी प्राप्त केलेले असून लोकांना फोन करून कर्ज देण्याच्या बहाण्याने प्रोसेसिंग फीच्या नावाखाली लोकांकडून पैसे उकळत होते. (Exposing the racket of cheating people under the pretext of giving loans in mumbai)

आतापर्यंत 13 हून अधिक लोकांची फसवणूक झाल्याचे उघड

आतापर्यंत तपासामध्ये आरोपींनी 13 पेक्षा जास्त लोकांची लाखो रुपयांपर्यंत फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी अटक होण्याची शक्यता आहे. आरोपी लोकांना फोन करून कर्जा संदर्भात माहिती द्यायचे. शिवाय पीडित लोकांकडून कागदपत्र मागून घ्यायचे आणि त्यानंतर इन्शुरन्स त्याचबरोबर प्रोसेसिंग फीच्या नावाखाली पैसे उकळायचे. युनिट 3 कडून सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून आणखी काही आरोपी पोलिसांच्या रडारवर आहेत.

चक्क एक बिलियन डॉलरची बनावट नोट विकण्याचा प्रयत्न

अमेरिकन बनावट डॉलर दाखवून त्याच्या बदल्यात भारतीय चलन घेऊन फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. वेळप्रसंगी भारतीय चलन देणाऱ्यावर हल्ला करून रक्कम पळविणे असाही हेतू त्यांचा होता. नांदेडमध्ये आलेल्या तेलंगणातील या टोळीला स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून एक बिलियन डॉलरची एक बनावट नोट जप्त केलीय. ह्या नोटेची भारतीय चलनातील किंमत साडेसातशे कोटी रुपये असल्याचे आरोपींने भासवले होते. आरोपींकडून कार, रोख आदी साहित्य असा 11 लाख 52 हजार 350 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. फसवणूक करणाऱ्या टोळीतील तीन लोकांना पोलिसांनी अटक केली तर दोघेजण गर्दीचा फायदा घेत पसार झाले. (Exposing the racket of cheating people under the pretext of giving loans in mumbai)

इतर बातम्या

Palghar Murder : पालघरमध्ये जमिन आणि पैशाच्या वादातून इसमाची हत्या

नागपूर पोलिसांकडून अल्पवयीन चोराला अटक, दागिन्यांसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.