उल्हासनगरच्या स्मशानाबाहेरच जीवघेणा हल्ला, चुलत भावानंच हल्ला केल्यानं एकच खळबळ

| Updated on: Feb 22, 2022 | 11:05 PM

Ulhasnagar attempt to murder : चॉपर, तलवारी, लाकडी दांडके यांनी या दोघांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन पळून गेले.

उल्हासनगरच्या स्मशानाबाहेरच जीवघेणा हल्ला, चुलत भावानंच हल्ला केल्यानं एकच खळबळ
कुख्यात गुंड आणि मोक्काच्या आरोपींच्या संपत्तीवर नागपूर पोलिसांची कारवाई
Follow us on

उल्हासनगर : उल्हासनगरात स्मशानाबाहेर दोघांवर जीवघेणा (attempt to murder) हल्ला करण्यात आला. किरकोळ वादातून चुलत भावानेच (Cousin) हल्ला केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. आता पोलिसांकडून हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला पोलिसांनी ताब्यातही घेतलंय. याप्रकरणी उल्हासनगर पोलिस आता अधिक तपास करत आहेत. तर इतर आरोपींचा शोध सुरु आहे. तर चार पथखं इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar Crime) खळबळ उडाली आहे. अंत्यसंस्काराला उपस्थित राहून स्मशानातून बाहेर पडताच दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणांच्याच चुलत भावाने हा हल्ला केलाय. याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपासही पोलिसांकडून सुरु करण्यात आला आहे.

या हल्ल्याचा आणखी एका हत्येशी संबंध आहे का? या पार्श्वभूमीवरही या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. कारण ज्यानं हा हल्ला घडवून आणला होता, त्याच्या भावाची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा

नेमका घटनाक्रम

उल्हासनगरच्या कॅम्प 5 मधील नगरसेवक आकाश पाटील यांचं मंगळवारी निधन झालं. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी कुर्ला कॅम्प रोडवरील स्मशानभूमीत अंबरनाथ गावात राहणारे त्यांचे नातलग श्रीबाबू पाटील, प्रसाद पाटील हे उपस्थित होते. तिथून बाहेर पडताच या दोघांवर त्यांचाच चुलत भाऊ विजय पाटील उर्फ चोबा याने हल्ला चढवला. यावेळी त्यासोबत इतर सात ते आठ साथीदारही सोबत होते.

चॉपर, तलवारी, लाकडी दांडके यांनी या दोघांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन पळून गेले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या श्रीबाबू पाटील आणि प्रसाद पाटील यांच्यावर कल्याणच्या फोर्टीस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेतील एक आरोपी रवी जयसिंघानी याला जमावाने पकडून मारहाण केली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय. तर मुख्य संशयित आरोपी विजय पाटील आणि अन्य आरोपींचा शोध घेण्यासाठी चार पथकं रवाना करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

का करण्यात आला हल्ला?

या हल्ल्यातील मुख्य आरोपी विजय पाटील हा नशेच्या आहारी गेल्याचा आरोप करण्यात आलाय. चुलत भाऊ पोलिसांकडे तक्रार करतात, या रागातून त्याने हा हल्ला केला असावा असा संशय व्यक्त केला जातो आहे. दरम्यान, संशयित आरोपी विजय पाटील याचा मोठा भाऊ मनसे शहर उपाध्यक्ष राकेश पाटील याची वर्षभरापूर्वी हत्या झाली होती.

त्यामुळे आजच्या प्रकरणाचा जुन्या प्रकरणाशी काही संबंध आहे का? याचीही पडताळणी पोलिसांकडून केली जातेय. मात्र सातत्यानं घडणाऱ्या या घटनांमुळे अंबरनाथ गाव परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

संबंधित बातम्या :

कल्याणमध्ये गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये घेऊन आणखी एक ज्वेलर्स फरार

मुलुंड भागात गोळीबाराच्या घटनेनं खळबळ! अमर नगर परिसरातली घटना, पोलिस आणि आरोपीमध्ये झटापट

यवतमाळमध्ये जादूटोण्याच्या संशयातून वृद्ध दाम्पत्याला जाळण्याचा प्रयत्न; 1 गंभीर 3 किरकोळ जखमी