नातीवर अत्याचार करणाऱ्या नराधम मुलाला आजीने पाठवले 25 वर्षे तुरुंगात; पोक्सो कोर्टाने दिला तीन महिन्यांत निकाल

| Updated on: Apr 06, 2022 | 4:02 PM

आजीने तिच्या नातीवर बापाने क्रूररित्या अत्याचार केल्याचे ठोस पुरावे पोलिसांपुढे सादर केले. तिने पोलिसांना केलेल्या सहकार्यामुळे 37 वर्षीय आरोपीची 25 वर्षांसाठी तुरुंगात रवानगी झाली आहे. विशेष पोक्सो न्यायाधीश भारती काळे यांनी हा महत्वपूर्ण निकाल देताना आजीचे कौतुक केले.

नातीवर अत्याचार करणाऱ्या नराधम मुलाला आजीने पाठवले 25 वर्षे तुरुंगात; पोक्सो कोर्टाने दिला तीन महिन्यांत निकाल
नातीवर अत्याचार करणाऱ्या नराधम मुलाला आजीने पाठवले 25 वर्षे तुरुंगात
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : लहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांत सर्वानीच गंभीर भूमिका घेण्याची गरज आहे. आरोपी नात्यातील असेल तरी त्याची गय करता कामा नये, असा संदेश देणारा विशेष पोक्सो न्यायालयातील खटला समोर आला आहे. 13 वर्षांच्या मुलीवर तिच्या बापाने लैंगिक अत्याचार (Abused) केला. पीडितेने तिच्यावरील अत्याचाराची आजीला कल्पना दिल्यानंतर आजीने मुलाविरोधातच लढा सुरु केला आणि अखेर मुलाला 25 वर्षे तुरुंगात पाठवले. विशेष पोक्सो न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत 25 वर्षांच्या सश्रम कारावासा (Prison)ची शिक्षा सुनावली आहे. हा निकाल देताना न्यायालयाने आजीचे कौतुक केले आहे. (Father sentenced to 25 years in imprisonment for abusing minor daughter)

नातीच्या रक्षणासाठी आजी पुढे सरसावली

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या माहितीनुसार 60 वर्षांच्या आजीने स्वतःच्या नराधम मुलाविरोधात उभे राहून आपल्या 13 वर्षीय नातीचा बचाव करीत तिला न्याय मिळवून दिला. न्यायालयातील आजीच्या यशस्वी लढ्याचे विशेष पोक्सो न्यायालयासह सर्वत्र कौतुक होत आहे. आजीने तिच्या नातीवर बापाने क्रूररित्या अत्याचार केल्याचे ठोस पुरावे पोलिसांपुढे सादर केले. तिने पोलिसांना केलेल्या सहकार्यामुळे 37 वर्षीय आरोपीची 25 वर्षांसाठी तुरुंगात रवानगी झाली आहे. विशेष पोक्सो न्यायाधीश भारती काळे यांनी हा महत्वपूर्ण निकाल देताना आजीचे कौतुक केले. नातीला न्याय मिळवून देण्यासाठी आजीने जे प्रयत्न केले, त्या प्रयत्नांना दाद दिली पाहिजे. भले या वयात आजीने तिच्या नातवंडांचा सांभाळ करणे ही जबाबदारी असली तरी तिने घेतलेल्या परिश्रमांचे कौतुक झालेच पाहिजे, असे न्यायाधीश भारती काळे यांनी या खटल्यात निकाल देताना नमूद केले. आजीने नराधम वृत्ती ठेचून काढण्यासाठी आपल्या पोटच्या मुलाचीही गय केली नाही. त्यामुळे हा खटला पोक्सो प्रकरणांत एक आदर्श उदाहरण ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया कायदेवर्तुळात व्यक्त केली जात आहे.

पीडितेच्या आईने सात वर्षांपूर्वी घर सोडले होते

2020 मध्ये हे प्रकरण घडले होते. पीडित मुलीची आई सात वर्षांपूर्वी कुटुंब सोडून घराबाहेर पडली होती. तेव्हापासून पीडित मुलगी ही वडील, आजी-आजोबा, काका आणि दोन भावंडांसोबत राहत होती. नराधम बापाने लैंगिक अत्याचार करायला सुरुवात केल्याच्या एका वर्षानंतर मे 2021 मध्ये पीडितेने तिच्या आजीला घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर आजीने पोलिसांत तक्रार केली. पुढे पीडित मुलगी व तिच्या आजीने न्यायालयात आरोपीविरुद्ध भक्कम साक्ष दिली. त्या आधारे विशेष पोक्सो न्यायालयाने तीन महिन्यांत सुनावणी पूर्ण करत निकाल दिला आणि 37 वर्षांच्या नराधमाला 25 वर्षांसाठी सक्तमजुरी सुनावली. आरोपीने आपल्या पाठीमागे मुलांचा सांभाळ करणारे कोणी नसल्याचे सांगितले. न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावली. आरोपीने आपल्याच मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. अशा परिस्थितीत त्याला सहानुभूती का दाखवायची, असा सवाल न्यायाधीशांनी यावेळी उपस्थित केला. सध्या एका निवारागृहात असलेल्या पीडित मुलीने यावेळी न्यायालयात सांगितले की, घरातील सर्वजण झोपलेले असताना तिचा बाप खोलीच्या एका कोपऱ्यात तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा. न्यायालयाने याची गंभीर दाखल घेत आरोपीला कुठलीही सहानुभूती दाखवण्यास स्पष्ट नकार दिला. (Father sentenced to 25 years in imprisonment for abusing minor daughter)

इतर बातम्या

Pune crime : उधारीचे पैसे मागितले म्हणून कुऱ्हाडीनं सपासप वार केले, हडपसरमध्ये सराईतास बेड्या

Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना आणखी एक झटका, सीबीआयने आर्थर रोड तुरुंगातून घेतले ताब्यात