Malad Murder : पत्नीची हत्या करुन पतीची गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती चिंताजनक

| Updated on: Jan 21, 2022 | 6:43 PM

तानाजी कांबळे आणि शीतल कांबळे हे जोडपे मालाडमधील लक्ष्मण नगर परिसरात राहतात. चार वर्षापूर्वी या जोडप्याचा विवाह झाला होता. मात्र त्यांना मूलबाळ होत नव्हते. याच कारणावरुन दोघांमध्ये सतत भांडण होत होते.

Malad Murder : पत्नीची हत्या करुन पतीची गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती चिंताजनक
दापोली तिहेरी हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश
Follow us on

मुंबई : घरगुती वादातून पतीने पत्नीची हत्या करुन स्वतः गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना मालाडमधील कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. तानाजी कांबळ (30) आणि शीतल तानाजी कांबळे (25) अशी पती पत्नीची नावे आहेत. पती तानाजी कांबळेला उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तर पत्नीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी कुरार पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील कारवाई करण्यात येत आहे. (Husband attempted suicide after killing his wife in a domestic dispute in Malad)

मूल होत नसल्याने पती-पत्नीमध्ये सुरु होते वाद

तानाजी कांबळे आणि शीतल कांबळे हे जोडपे मालाडमधील लक्ष्मण नगर परिसरात राहतात. चार वर्षापूर्वी या जोडप्याचा विवाह झाला होता. मात्र त्यांना मूलबाळ होत नव्हते. याच कारणावरुन दोघांमध्ये सतत भांडण होत होते. याच भांडणाला कंटाळून शीतल आपल्या माहेरी निघून गेली होती. गेल्या सहा महिन्यांपासून पती-पत्नी वेगळे राहत आहेत. सध्या ती आपल्या आईसोबत माहेरी राहत होती. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास तानाजीने शीतलला लक्ष्मण नगरमधील आपल्या घरी भेटायला बोलावले होते.

घरी येताच पुन्हा दोघांमध्ये भांडण सुरु झाले. भांडण इतके विकोपाला गेले की संतापलेल्या पतीने पत्नीच्या पोटात 4 ते 5 वार करुन तिची हत्या केली. त्यानंतर स्वतःही घरातील पंख्याला गळफास लावून घेतला. तानाजीला गळफास घेतलेल्या अवस्थेत शेजाऱ्यांनी खिडकीतून पाहिले. त्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.

पतीची प्रकृती चिंताजनक

घटनेची माहिती मिळताच कुरार पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तानाजीला खाली उतरवून शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तर शीतलचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. (Husband attempted suicide after killing his wife in a domestic dispute in Malad)

इतर बातम्या

Wardha Crime : हिंगणघाट जळीत कांड प्रकरणी न्यायालय 5 फेब्रुवारीला सुनावणार निकाल

Nagpur Crime | रामटेकमधील दुहेरी खुनाचा उलगडा; कुऱ्हाडीने वार करून फेकले होते, नेमकं काय घडलं?