19 वर्षीय कैद्याचे 20 वर्षीय कैद्याशी अनैसर्गिक शरीरसंबंध, आर्थर रोड जेलमध्ये भयंकर प्रकार

19 वर्षीय कैद्याचे 20 वर्षीय कैद्याशी अनैसर्गिक शरीरसंबंध, आर्थर रोड जेलमध्ये भयंकर प्रकार
कैदी
Image Credit source: tv9

आरोपीने पीडित कैद्याची पॅंट उघडली आणि त्याच्यावर जबरदस्ती केली. पीडित तरुणाने त्याला विरोध केला. पीडितानेच ही माहिती अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर कारागृह अधीक्षकांनी पोलिसांना माहिती दिली.

अनिश बेंद्रे

|

May 17, 2022 | 8:25 AM

मुंबई : मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये (Arthur Road Jail) भयंकर प्रकार समोर आला आहे. एका पुरुष कैद्याने (Prisoner) दुसऱ्या पुरुष कैद्यासोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी पीडित कैद्याने तुरुंग प्रशासनाकडे तक्रार दिली. त्यानंतर ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात आरोपी कैद्याविरुद्ध या प्रकरणी गुन्हा दाखल (Mumbai Crime News) करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

दक्षिण मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये 14 मे रोजी ही घटना घडल्याची माहिती आहे. घटनेच्या एका दिवसानंतर पीडितेने याबाबत सांगितले. एनएम जोशी मार्ग पोलिस ठाण्यात 19 वर्षीय कैद्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 20 वर्षीय कैद्याने या प्रकरणी तक्रार दिली होती. ‘आज तक’ वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर यासंदर्भात बातमी देण्यात आली आहे.

आरोपींनी उच्च सुरक्षा असलेल्या कारागृहाच्या बॅरेक 7 मध्ये हा गुन्हा केला आहे. आयपीसी अंतर्गत अनैसर्गिक गुन्हा, स्वेच्छेने दुखापत करणे आणि गुन्हेगारी स्वरुपाची धमकी देणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

नेमकं काय घडलं?

या प्रकरणी एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्हाला आर्थर रोड जेलमधील जेलरने या घटनेची माहिती देण्यासाठी फोन केला. त्याने सांगितले की, आरोपीने पीडित कैद्याची पॅंट उघडली आणि त्याच्यावर जबरदस्ती केली. पीडित तरुणाने त्याला विरोध केला. पीडितानेच ही माहिती अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर कारागृह अधीक्षकांनी आम्हाला माहिती दिली. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला लवकरच अटक करण्यात येईल, त्यानंतर आम्ही घटनेची चौकशी करु” असेही पोलिस अधिकाऱ्याने सांगितले

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें