CCTV VIDEO | पाठलाग करुन तरुणाची सोन्याची चेन हिसकावली, डोंबिवलीतील घटना सीसीटीव्हीत कैद

| Updated on: Oct 31, 2021 | 1:25 PM

डोंबिवलीतील कैलास नगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली होती. 26 ऑक्टोबरच्या रात्री बारा वाजताच्या सुमारास चंद्रशेखर गुप्ता हा तरुण आपल्या घरी जात होता. यावेळी तीन तरुणांनी चंद्रशेखर यांना हटकले. आणि त्यांच्यासोबत मारहाण सुरु केली.

CCTV VIDEO | पाठलाग करुन तरुणाची सोन्याची चेन हिसकावली, डोंबिवलीतील घटना सीसीटीव्हीत कैद
डोंबिवलीत तरुणाच्या गळ्यातील सोन्याची चेन लंपास
Follow us on

डोंबिवली : रात्री बारा वाजताच्या सुमारास घरी जाणाऱ्या तरुणाला मारहाण करुन त्याची सोन्याची चेन हिसकावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहरात हा प्रकार घडला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

काय आहे प्रकरण?

डोंबिवलीतील कैलास नगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली होती. 26 ऑक्टोबरच्या रात्री बारा वाजताच्या सुमारास चंद्रशेखर गुप्ता हा तरुण आपल्या घरी जात होता. यावेळी तीन तरुणांनी चंद्रशेखर यांना हटकले. आणि त्यांच्यासोबत मारहाण सुरु केली.

पाठलाग करुन सोन्याची चेन हिसकावली

स्वतःला वाचवण्यासाठी गुप्ता यांनी पळण्याचा प्रयत्न केला, मात्र हल्लेखोर थांबले नाहीत. त्यांनी गुप्ता यांचा पाठलाग सुरु केला आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून लुटारु पसार झाले.

सीसीटीव्हीमुळे चोर पकडले

डोंबिवलीतील विष्णुनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलिसांनी तपास सुरु केला. कल्याण क्राइम ब्रांच पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावण्यात यश आले आहे.

तिघांपैकी एक आरोपी अल्पवयीन

तिघांपैकी दोन आरोपींना कल्याण क्राइम ब्रांच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील एक आरोपी अल्पवयीन आहे तर दुसऱ्या आरोपीचे नाव साहिल गायकवाड असे आहे. पोलीस तिसऱ्या आरोपीच्या शोधात आहेत. कल्याण-डोंबिवलीत रस्त्यावर लुटीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

सावंतवाडीत भरवस्तीत दुहेरी हत्याकांड, दोन वयोवृद्ध महिलांचा राहत्या घरी खून

दिवाळीची रोषणाई करताना विजेचा धक्का, पतीचा मृत्यू, वाचवायला गेलेली पत्नी-मुलंही जखमी

CCTV VIDEO | मटण शॉपमधून 9 बकरे चोरीला, दुसऱ्यावर आळ घेण्याचा डाव सीसीटीव्हीमुळे फसला