CCTV | सीसीटीव्ही लावल्यावरुन वाद, सोसायटी सदस्यांनी बापलेकाला केलेली मारहाणही सीसीटीव्हीत कैद

सोसायटीच्या पार्किंगमध्ये असलेला सोसायटीचा कॅमेरा नादुरुस्त असल्याने वाच्छानी यांनी स्वतःच्या वाहनांच्या सुरक्षेसाठी स्वतः एक कॅमेरा पार्किंगमध्ये लावला होता. मात्र हा कॅमेरा कुणाला विचारून लावला? असं विचारत सोसायटीतल्याच काही लोकांनी त्यांच्याशी हुज्जत घातली.

CCTV | सीसीटीव्ही लावल्यावरुन वाद, सोसायटी सदस्यांनी बापलेकाला केलेली मारहाणही सीसीटीव्हीत कैद
उल्हासनगरमधील मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद
| Edited By: | Updated on: Apr 09, 2022 | 2:16 PM

ठाणे : सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरावरून (CCTV Camera) सोसायटीच्या दोन सदस्यांमध्ये वाद झाले. त्यातून बाप लेकाला मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. ही घटना ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरामध्ये (Ulhasnagar Crime) घडली आहे. सीसीटीव्हीवरुन झालेल्या मारहाणीची ही घटनाही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात चौघा जणांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा (Beaten up) दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

उल्हासनगरच्या कॅम्प 3 मधील शांतीनगर परिसरात पारस अपार्टमेंट ही सोसायटी आहे. या सोसायटीत एका बिल्डिंगमध्ये राहणारे शंकर वाच्छानी यांच्या चारचाकी गाडीचं काही दिवसांपूर्वी अज्ञातांनी नुकसान केलं होतं.

सोसायटीतील सदस्यांची हुज्जत

सोसायटीच्या पार्किंगमध्ये असलेला सोसायटीचा कॅमेरा नादुरुस्त असल्याने वाच्छानी यांनी स्वतःच्या वाहनांच्या सुरक्षेसाठी स्वतः एक कॅमेरा पार्किंगमध्ये लावला होता. मात्र हा कॅमेरा कुणाला विचारून लावला? असं विचारत सोसायटीतल्याच काही लोकांनी त्यांच्याशी हुज्जत घातली.

चौघांनी बापलेकाला मारहाण केल्याचा आरोप

यावरून झालेल्या वादविवादाचं पर्यावसान हाणामारीत झालं. यामध्ये याच सोसायटीत राहणारे प्रमोद आव्हाड, प्रदीप आव्हाड, एकनाथ आव्हाड आणि सुभाष आव्हाड या चौघांनी शंकर वाच्छानी आणि त्यांचा मुलगा कृष्णा या दोघांना मारहाण केल्याचा आरोप आहे.

मारहाणीची ही घटना वाच्छानी यांच्याच सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या चार जणांच्या विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

Nanded CCTV | गाड्यांच्या जाळपोळीचं सत्र नांदेडातही, पार्किंगमध्ये घुसून तीन दुचाकी पेटवल्या

Nashik CCTV | विनाहेल्मेट पेट्रोल का दिले नाही, नाशकात बाईक चालकाचा पंपावर राडा, कर्मचाऱ्यांशी बाचाबाची

CCTV | उधारी परत करण्याचा तगादा, पुण्यात 34 वर्षीय तरुणाच्या हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद