Prabhakar Sail | 23 लाख कांतीला, 26 लाख किरण गोसावीला; प्रभाकर साईलचे खळबळ उडवणारे आरोप कोणते होते?

प्रभाकर साईल यांनी एनसीबीचे तत्कालीन विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांच्यासह नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांवर खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता

Prabhakar Sail | 23 लाख कांतीला, 26 लाख किरण गोसावीला; प्रभाकर साईलचे खळबळ उडवणारे आरोप कोणते होते?
Prabhakar Sail
Image Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Apr 02, 2022 | 12:06 PM

मुंबई : कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील (Cordelia cruise drug case) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे पंच साक्षीदार प्रभाकर साईल यांचं निधन झाल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. शुक्रवारी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे प्रभाकर साईल (Prabhakar Sail) यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती त्यांचे वकील तुषार खंदारे यांनी दिली. मुंबईतील चेंबूर येथील माहुल भागात असलेल्या त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) सोडण्यासाठी खंडणी मागितल्याचा आरोप प्रभाकर साईल यांनी केला होता. प्रभाकर साईल यांनी एनसीबीचे तत्कालीन विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांच्यासह नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांवर खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता

प्रभाकर साईल यांनी काय आरोप केले होते?

आर्यन खानला एनसीबीने ताब्यात घेतलं, त्या रात्री पडद्यामागे काय घडलं, याविषयी प्रभाकर साईल यांना 9 नोव्हेंबर 2021 रोजी ‘टीव्ही9 मराठी’तर्फे प्रश्न विचारण्यात आला होता. “2 तारखेच्या रात्री किरण गोसावी खाली आले, थोड्या अंतरावर सॅम डिसुझा आले, त्यांना मी पहिल्यांदा पाहिलेलं. अडीच ते तीन वाजताच्या दरम्यान त्यांच्या दोन मीटिंग झाल्या. तीन वाजता ते बडे मियांला भेटले. तिथे चहा प्यायले. त्यानंतर सॅम डिसुझांची गाडी फॉलो करण्यास माझ्या ड्रायव्हरला सांगितलं गेलं.” असं प्रभाकर साईल यांनी त्यावेळी सांगितलं होतं.

“पूजा ददलानीही आलेली”

“वरळी नाक्याला आम्ही पाच मिनिटं थांबलो, तिथून लोअर परेलला ब्रिजखाली थांबलो. आधी आमची गाडी पोहोचली होती, मग पूजा ददलानीची (शाहरुख खानची मॅनेजर) निळी मर्सिडीज तिथे आली, नंतर सॅमची इनोव्हा गाडी आली. पूजा गाडीतच बसली होती, तिच्यासोबत आणखी एक व्यक्ती होती. त्या व्यक्तीसोबत त्यांची बस स्टॉपच्या मागे असलेल्या चाळीजवळ मीटिंग झाली.” असं साईल यांनी सांगितलं होतं.

“दुसऱ्या दिवशी, म्हणजे तीन तारखेला सकाळी पावणेदहा वाजता मी इंडियाना हॉटेलजवळ पोहोचलो. पन्नास लाख घेतले. सुनिल पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे 23 लाख एके ठिकाणी ड्रॉप केले, त्यांचं नाव कांती होतं. उरलेले एक लाख सुनील पाटील यांच्या अॅक्सिस खात्यात ट्रान्सफर केले. काळबादेवी भागातून मनी ट्रान्सफर केले. उरलेले 26 लाख किरण गोसावीला वाशीतील राहत्या घरी दिले” असंही साईल यांनी त्यावेळी सांगितलं होतं.

पाहा 9 नोव्हेंबर 2021 रोजीचा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

धक्कादायक ! आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईलचं निधन, हार्ट अटॅकनं मृत्यू झाल्याची माहिती

Mumbai | प्रभाकर साईल आणि गोसावी यांच्याशिवाय चौकशी पूर्ण होऊ शकत नाही, कारण…

पैशाची देवाण-घेवाण झाल्याचं गोसावीने मान्य केलं, प्रभाकर साईलचे वकील तुषार खंदारेंचा दावा