AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याणच्या टिटवाळ्यात अतिशय धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना, पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या

पती-पत्नीचं नात खूप सुंदर असतं. या नात्यात प्रेम, जाणीव, समर्पण आणि समजुतदारपणा असतो. पण काही स्वार्थी लोकं या नात्याचा आदर करत नाहीत. त्यांना आपल्या पत्नीची जाणीव नसते. ते तिच्याशी फार अमानुषपणे वागतात. वेळप्रसंगी ते तिचा जीव घ्यायलाही मागेपुढे बघत नाहीत. कल्याणच्या टिटवाळा परिसरात अशीच एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे.

कल्याणच्या टिटवाळ्यात अतिशय धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना, पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Dec 04, 2023 | 10:35 PM
Share

सुनील जाधव, Tv9 मराठी, कल्याण | 4 डिसेंबर 2023 : कल्याण जवळच्या टिटवाळा शहरात पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी पतीने हत्या करून पत्नीचा मृतदेह ड्रममध्ये भरून जंगलात फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच आरोपीने पत्नीच्या डोक्यात फावड्याचा दांडा टाकून, तिची गळा आवळून हत्या केली. अलीमुन अन्सारी (वय 35) असं मृत पत्नीचं नाव आहे. तर मैनोद्दीन अन्सारी असं आरोपी पतीचं नाव आहे. पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. आरोपी पती आपल्या पत्नीची इतक्या निर्घृणपणे हत्या करुच कसा शकतो? असा प्रश्न परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. याप्रकरणी मृत महिलेचे वडील मोहमंद इंद्रीस सुबेदार खान यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. तर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

फिर्यादी मोहमंद इंद्रीस सुबेदार खान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी मैनोद्दीन अन्सारी याचं 2012 मध्ये अलीमुन अन्सारी यांच्याशी लग्न झालं होतं. दोघांना 11 वर्षांचा मुलगा देखील आहे. लग्नानंतर मैनोद्दीन आपल्या पत्नीसोबत चांगलं वागत होता. पण गेल्या तीन वर्षांपासून तो पत्नीला आपल्या माहेरच्यांकडून रिक्षा घेण्यासाठी 2 लाख रुपये आण, असा तगादा लावत होता. तो पैशांसाठी सातत्याने पत्नीला मारहाण करायचा. शेवटी अलीमुनच्या आई-वडिलांनी 80 हजार रुपये दिले. पण तरीही तो सातत्याने अलीमुनच्या मागे पैशांसाठी लागत होता. याबाबत अलीमुनच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत सविस्तर सांगितलं आहे.

पतीने जीवे मारण्याची धमकी दिली

“एक महिन्यापूर्वी माझी पत्नी हकीमुन आणि मुलगा अहमद हे टिटवाळा येथे मुलीच्या घरी गेले होते. त्यांनी जावई मैनुद्दिन याला मुलीला त्रास देवू नका, असं समजावून सांगितलं होतं. माझी पत्नी हकीमुन हिने मुलगी अलीमुनला रविवारी संध्याकाळी 6 वाजता फोन करुन खुशाली विचारली. तेव्हा मुलगी अलीमुन हिने सांगीतलं की, तिला मैनुद्दिन याने माहेरहून रिक्षा घेण्यासाठी 2 लाख रुपये आण, नाहीतर तुला मारुन टाकेन, असा दम दिला. मी मुलीला समजावून सांगीतले तुला आजपर्यंत आम्ही 80 हजार रुपये दिलेले आहेत. आता आमच्याकडे पैसे नाहीत. तरीपण आम्ही थोडफार पैसे देतो, असे समजावून सांगितलं होतं”, असं मृतक महिलेच्या वडिलांनी आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे.

आरोपीने महिलेच्या आईला हत्येची माहिती दिली

दरम्यान, “मृतक महिलेची आई हकीमुन यांनी सोमवारी (4 डिसेंबर) मुलीला फोन केला. पण मुलीने फोन उचलला नाही. त्यामुळे हकीमुन यांनी दुपारी एक वाजता जावायाला फोन केला. यावेळी जावायाने धक्कादायक माहिती दिली. मी अलीमुन हिचा खून करून तिला जंगलात फेकून दिलंय. आता मी पोलीस ठाण्यात जातोय”, असं जावायाने हकीमुन यांना सांगितल्याची माहिती महिलेच्या वडिलांनी फिर्यादीत दिली आहे.

“आम्ही सदर घटना माझ्या नातेवाईकांना सांगून माझी पत्नी हकीमुन, मुलगा अहमद, माझा मोठा भाऊ मोहमंद हदीस खान आणि इतरांसह कल्याण तालुका पोलीस ठाण्यात आलो, त्यावेळी पोलीसांकडून समजले की, पोलीस मैनुद्दीन याला घेवून नाळींबी गावाकडे घडलेल्या हकीगतीची खात्री करण्यासाठी गेले आहेत. आता मला पोलिसांकडून समजले की, नाळींबी गावाच्या शिवारात, नाळींबी ते अंबरनाथ दरम्यान जंगलातील रोडच्या कडेला काळ्या रंगाचे झाकण असलेल्या निळ्या रंगाचा ड्रममध्ये माझ्या मुलीचा मृतदेह सापडला आहे”, असं फिर्यादी वडिलाने सांगितलं आहे.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत