AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

#क्राईम_किस्से Nafisa Joseph | लग्नाच्या तोंडावर गळफास, मिस इंडिया नफीसा जोसेफच्या आत्महत्येसाठी बॉयफ्रेण्डला ठरवलेले जबाबदार

नफीसा जोसेफ 29 जुलै 2004 रोजी मुंबईतील वर्सोवा येथील भाड्याने राहत असलेल्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली होती. एका महिन्याने (28 ऑगस्ट 2004) ती व्यावसायिक गौतम खंडूजाशी लग्न करणार होती.

#क्राईम_किस्से Nafisa Joseph | लग्नाच्या तोंडावर गळफास, मिस इंडिया नफीसा जोसेफच्या आत्महत्येसाठी बॉयफ्रेण्डला ठरवलेले जबाबदार
Nafisa Joseph
| Edited By: | Updated on: Aug 24, 2021 | 8:28 AM
Share

मुंबई : मॉडेल आणि व्हिडीओ जॉकी नफीसा जोसेफ (Nafisa Joseph) हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. बॉयफ्रेण्ड आणि बिझनेसमन गौतम खंडुजा (Gautam Khanduja) याने फसवल्याने तिने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप झाला होता. 29 जुलै 2004 रोजी वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी तिने आयुष्याची अखेर केली होती. लग्न अवघ्या काही आठवड्यांवर आले असताना तिने टोकाचं पाऊल उचललं होतं.

28 मार्च 1978 रोजी नफीसाचा जन्म दिल्लीत झाला, तर बंगळुरुमध्ये ती लहानाची मोठी झाली. तिने वयाच्या 12 व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली. नफीसाच्या शेजाऱ्यांनी तिला वेअरहाऊसच्या जाहिरातीसाठी मॉडेलिंग करण्याची संधी दिली होती.

मिस इंडियाचा मुकूट जिंकला

नफीसा जोसेफ ही फेमिना मिस इंडिया युनिव्हर्स 1997 ची विजेती होती. या स्पर्धेत सर्वात लहान स्पर्धक असूनही तिने बाजी मारली होती. मियामी बीचवर रंगलेल्या मिस युनिव्हर्स 1997 च्या स्पर्धेत ती टॉप 10 फायनलिस्ट होती.

बहरणारी कारकीर्द

1999 मध्ये नफीसा एमटीव्ही इंडिया व्हीजे हंट (MTV India VJ Hunt) या स्पर्धेची परीक्षक होती. आठवड्याभरानंतर तिला MTV वर शो होस्ट करण्यासाठी स्क्रीन टेस्टसाठी बोलावण्यात आले. त्यानंतर तिने जवळजवळ पाच वर्षे एमटीव्ही हाऊस फुल या शोचे अँकरिंग केले. तिने C.A.T.S या मालिकेमध्येही काम केले होते.

लग्नाच्या काही आठवड्यांपूर्वी गळफास

नफीसा जोसेफ 29 जुलै 2004 रोजी मुंबईतील वर्सोवा येथील भाड्याने राहत असलेल्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली होती. सिलिंग फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत रात्री नऊ वाजता तिचा मृतदेह सापडला होता. बरोबर एका महिन्याने (28 ऑगस्ट 2004) ती व्यावसायिक गौतम खंडूजाशी लग्न करणार होती. तिच्या पालकांच्या म्हणण्यानुसार, लग्न मोडल्यामुळेच नफीसाने हे टोकाचे पाऊल उचलले. गौतम खंडूजाने दोन वर्षांपूर्वी त्याचा घटस्फोट झाल्याचं नफीसा आणि तिच्या कुटुंबीयांना सांगितलं होतं, मात्र तो अजूनही विवाहित असल्याचं समजल्याने नफीसाच्या पायाखालची जमीन सरकल्याचं तिच्या आई-वडिलांनी सांगितलं होतं.

गौतम खंडुजाची टाळाटाळ

नफीसाने खडसावल्यानंतर गौतम खंडूजाने आपल्या वैवाहिक जीवनाबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास किंवा घटस्फोटाची कागदपत्रे सादर करण्यास टाळाटाळ केली होती. नफीसाने त्याच्या बायकोला भेटण्याचं सांगितल्यावर गौतमने तिला ब्लॅकमेल करण्याची धमकी दिली, असं त्यावेळी मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं होतं.

नफीसाच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप करत तिच्या आई -वडिलांनी पोलिसात गौतम खंडूजाविरोधात तक्रार दाखल केली होती. गौतम खंडूजा या नात्यातून बाहेर पडण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होता, असा दावा त्यांनी केला. नोव्हेंबर 2005 मध्ये खंडूजाविरोधातील खटल्याला मुंबई उच्च न्यायालयाने जानेवारी 2006 पर्यंत स्थगिती दिली. खंडूजाने दावा केला होता की, आपण नफीसा जोसेफच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा कोणताही पुरावा नाही.

मैत्रीण कुलजीत रंधावाचाही गळफास

नफीसाच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन वर्षांतच तिची मैत्रीण मॉडेल-अभिनेत्री कुलजीत रंधावा (Kuljeet Randhawa) हिने सुद्धा राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ‘कॅट्स’ या मालिकेत दोघींनी एकत्र भूमिका केल्या होत्या. आयुष्यातील ताणतणावांना कंटाळून वयाच्या अवघ्या तिशीतच 8 फेब्रुवारी 2006 रोजी कुलजीतने आयुष्याची अखेर केली होती.

संबंधित बातम्या :

Kuljeet Randhawa | पोलिसाची अभिनेत्री कन्या, कुलजीत रंधावाने तिशीतच संपवलेलं आयुष्य, सुसाईड नोटमध्ये उलगडलं कारण

Parveen Babi | परवीन बाबी राहत्या घरी सापडलेली मृतावस्थेत, सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रीचा उपासमारीने बळी

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.