
Mumbai Traffic Police Video : रोज चाकरमानी आपापली वाहने घेऊन वेळेवर ऑफिसला जातात आणि वेळेवर घरी पोहोचतात ते फक्त वाहतूक पोलिसांमुळे. दिवस किंवा रात्र न पाहता वाहतूक पोलीस अव्याहतपणे त्यांचं काम करत असतात. वाहन चालकांनी आपापली वाहने नियमानुसार चालवावीत यासाठी ते नेहमीच लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. वेळप्रसंगी ते दंडही आकारण्यास मागेपुढे पाहात नाहीत. सध्या मात्र मुंबईत एक अजब प्रकार घडला आहे. मुंबईच्या शिवसेनाभवनासमोर एका वाहतूक पोलिसाला ट्रकखाली चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून ट्रकचालकावर कठोरातील कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे?
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील सेनाभवनासमोरच हा गंभीर प्रकार घडला आहे. इथे एक वाहतूक पोलीस ट्रकचालकाला काही सूचना देत होता. मात्र या सूचना धुडकावून लावत ट्रकचालकाने थेट वाहतूक पोलिसाच्या अंगावरून ट्रक घालण्याचा प्रयत्न केला. या दुर्घटनेत वाहतूक पोलीस बालंबाल वचावला आहे. विश्वास बंडखर असे वाहतूक पोलिसाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील टिळक ब्रिजवर मोठी वाहतूककोंडी झाली होती. त्यामुळेच दुसऱ्या मार्गाने जा असं वाहतूक पोलीस ट्रकचालकाला सांगण्याचा प्रयत्न करत होता. मात्र वाहतूक पोलिसाचा एकही शब्द न ऐकता ट्रक चालकाने थेट ट्रॅफिक पोलिसाच्या ट्रक घालण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार अवघ्या काही सेकंदांत घडला. यात सुदैवाने विश्वास बंडघर यांना कोणतीही इजा झालेली नाही. ते सुखरुप आहेत. मात्र ट्रकचालकाच्या या हेकेखोर स्वभावामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
या संपूर्ण घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडिओ वाहतूक पोलीस ट्रकचालकाला काही सूचना करताना दिसतोय. तसेच नियम मोडल्यामुळे पोलीस ट्रकचा एक फोटो काढून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे या फोटोत दिसत आहे. मात्र कायदेशीर कारवाई होईल या भीतीमुळे ट्रकचालकाने तिथून ट्रकसोबत पळ काढण्याचा प्रयत्न केला. हे करताना ट्रकचालकाने पोलिसालाही ट्रकखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. पण दैव बलवत्तर म्हणून ट्रॅफिक पोलीस वचावला. मिळालेल्या माहितीनुसार या ट्रकचालकाला पुढे ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.