AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई हादरली! जेवणाच्या वादाचा हादरवणारा शेवट, 5 मित्रांनी असा कांड रचला की त्याला आयुष्यातून उठवलं

एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 5 जणांमध्ये जेवणावरून झालेला वाद इतका टोकाला गेला की एकाची हत्या झाली. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक झाली आहे तर बाकी चार फरार झाले आहेत.

मुंबई हादरली! जेवणाच्या वादाचा हादरवणारा शेवट, 5 मित्रांनी असा कांड रचला की त्याला आयुष्यातून उठवलं
MumbaiImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Sep 11, 2025 | 5:27 PM
Share

राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहेत. मुंबईत असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका बार अँड रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलेल्या व्यक्तीचा वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की त्याने आपल्या 4 मित्रांना तेथे बोलावून घेतले. त्या व्यक्तीचे चारही मित्र तातडीने तेथे पोहोचले. त्यांनी पाच जणांनी मिळून वाद झालेल्या व्यक्तीला लाथा बुक्क्या घातल्या. दरम्यान, त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.

नेमकं काय घडलं?

मुंबईतील मालाड पश्चिम येथील चिंचोली बंदर परिसरात ही घटना घडली आहे. तेथील गुरुकृपा बार अँड रेस्टॉरंटमध्ये जेवणावरून संजय मकवाना आणि कल्पेश भानुशालीशी यांच्यामध्ये वाद झाला. संजयला राग अनावर झाला. त्याने कल्पेशला धडा शिकवण्यासाठी चार मित्रांना फोन लावून तेथे बोलावून घेतले. संजय आणि त्याच्या पाच मित्रांनी लाथा आणि शस्त्रांनी कल्पेश भानुशालीवर हल्ला केला.

वाचा: घरातच होती गर्लफ्रेंड, तरी गुपचूप 6 मुलींसोबत चालू होता रोमान्स.. पण एका कुत्र्यामुळे उघड झालं रहस्य!

डॉक्टरांनी केले मृत घोषित

संजयच्या मित्रांनी कल्पेशला धडा शिकवण्यासाठी डोक्यात बिअरच्या बाटल्या फोडल्या. त्यामुळे कल्पेश गंभीर जखमी झाला. ही घटना पहाटे ३ वाजता घडली. कल्पेशला स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी कल्पेश भानुशालीला मृत घोषित केले. या हत्याकांडातील एका आरोपीला मालाड पोलिसांनी अटक केली आहे. तर बाकीचे चार आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

कल्पेशचा भाऊ परेश भानुशालीने, ‘जर गुरुकृपा बार अँड रेस्टॉरंट इतक्या उशिरापर्यंत उघडले नसते तर माझ्या भावाचा जीव वाचला असता. जेवणाच्या कारणावरून हा वाद झाला आणि संजय मकवाना यांनी त्याच्या मित्रांसह माझ्या भावाला लाथा मारून आणि बिअरच्या बाटलीने आणि धारदार शस्त्राने हल्ला करून ठार मारले. मालाड पोलिसांनी आतापर्यंत एका आरोपीला अटक केली आहे आणि चार आरोपी फरार आहेत’ असे म्हटले आहे.

डीसीपी संदीप जाधव यांनी दिली माहिती

पोलीस उपायुक्त संदीप जाधव यांनी या प्रकरणाची माहिती दिली आहे. काल रात्री १:३० च्या सुमारास गुरुकृपा बार अँड रेस्टॉरंटजवळ हाणामारी झाली. ज्यामध्ये पाच जणांनी मिळून एका व्यक्तीची हत्या केली. ज्यामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि ४ फरार आहेत. मालाड पोलिस पुढील तपास करत आहेत असे ते म्हणाले.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.