Mumbai Crime : ब्रेकअपनंतर पॅचअप व्हावं म्हणून तिने बॉयफ्रेन्डची बाईक चोरली! पवईतील प्रेम कहाणी…

| Updated on: Jul 16, 2022 | 8:46 AM

Mumbai Powai Crime News : बाईक चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांना करण्यात आली होती.

Mumbai Crime : ब्रेकअपनंतर पॅचअप व्हावं म्हणून तिने बॉयफ्रेन्डची बाईक चोरली! पवईतील प्रेम कहाणी...
पवईत चोरी...
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : प्रेम परत (Mumbai Love Story) मिळावं म्हणून लोकं काय करतील, याचा अंदाज बांधण कल्पनेच्या पलिकडचं आहे, हे अधोरेखित करणारी एक घटना समोर आली आहे. पवईत एका तरुणीने चक्क आपल्याच बॉयफ्रेन्डची बाईक चोरली. आपलं प्रेम परत मिळावं, म्हणून तिने हे पाऊल उचललं होतं. अखेर या तरुणीला पवई पोलिसांनी (Powai Police) अटक केली. पण बाईक चोरीआधीचा घटनाक्रम एखाद्या सिनेमाला साजेसा असा होता. आधी ज्या तरुणाने ब्रेक अप केला, त्याच्यासोबत पॅचअप करण्यासाठी तरुणीनं प्रयत्न केले. पण तो काही भाव देत नाही, कळल्यानंतर तरुणीनं चक्क त्याची बाईकच चोरली. चोरलेली बाईक एका अडगळीच्या ठिकाणी लपवली. याप्रकरणी तरुणाने पोलिसात धाव घेतल्यानंतर पोलिसांनी तपास केला. पण बाईक काही मिळाली नाही. मग अचानक एक दिवस नेमकं असं काय झालं की पोलिसांनी या तरुणाची गर्लफ्रेन्ड राहिलेल्या तरुणीलाच अटक (Mumbai Crime News) केली? या मागचा घटनाक्रम फारच रंजक आहे.

तर सुरुवात इथून झाली होती..!

तर त्याचं झालं असं, की पवईत राहणाऱ्या या तरुणाचे आणि तरुणीचे एकमेकांवर प्रेम होतं. प्रेमात दोघं आकंठ बुडाले होते. पण एके दिवशी तरुणीच्या नातलगांनी तरुणाविरोधात तक्रार केली. तक्रारीनंतर तरुणाला पोलिसांनी अटक केली. यातून धास्ती घेतलेल्या तरुणाने तरुणीसोबतचे संबंध संपवले. ब्रेकअप केला. सगळं विसरुन तो नव्या आयुष्याची सुरुवात करु लागला.

म्हणून बाईक लपवली

जुनं विसरुन नव्या प्रवासाला लागलेल्या या तरुणाला कामही मिळालं. एका फुड डिलिव्हरी कंपनीत तो कामाला लागला. याबाबत तरुणीला कळालं. तरुणी पुन्हा तरुणाच्या प्रेमात पडली. त्यानेही आपल्या प्रेमात पडावं म्हणून प्रयत्न करु लागली. तरुणी या तक्रारदार तरुणाला फोन, मेसेज करायची. पण तो काही प्रतिसाद देईना. अखेर आपलं प्रेम परत मिळावं, म्हणून तरुणीने अखेर या तरुणाची बाईक चोरली. त्यासाठी एका मित्राची मदत घेतली. पवईत एका ठिकाणी हा बाईक तरुणीने लपवून ठेवली.

हे सुद्धा वाचा

क्लोज केलेली फाईल पुन्हा उघडली

बाईक चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांना करण्यात आली होती. पण बाईक काही मिळाली नाही, म्हणून पोलिसांनी तपासानंतर अखेर कोर्टात अ समरी फाईल केली होती. पण काही दिवस उलटले आणि तरुणाला या त्याच्या जुन्या गर्लफ्रेन्डनेच बाईक कुठे आहे, याची माहिती दिली. ही माहिती पोलिसांना तरुणाने दिली. यानंतर पोलिसांनी कोर्टाची परवानगी घेऊन पुन्हा तपास केला आणि बाईक शोधून काढली.

तरुणीला अटक

वेबारस मोटार सायकल म्हणून ही बाईक देवदार वाहन डम्पिंग ग्राऊंड इथं आढळून आली. ही बाईक पोलिसांनी ताब्यात घेतली आणि तरुणीला चौकशीसाठी बोलावलं. त्यानंतर तिनं घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. अखेर पोलिसांनी या तरुणीला अटक केली आणि तिची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली.