AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai news : पती-पत्नी हॉटेलमध्ये जेवायला गेले, ऑर्डर येताच समोरील दृश्य पाहून धक्काच बसला !

एक जोडपे एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले होते. त्यांनी आपल्या आवडत्या डिश मागवल्या आणि जेवायला सुरवात केली. मात्र जेवत असताना अचानक डिशमध्ये जे दिसलं ते पाहून त्यांना धक्काच बसला.

Mumbai news : पती-पत्नी हॉटेलमध्ये जेवायला गेले, ऑर्डर येताच समोरील दृश्य पाहून धक्काच बसला !
प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये जेवणात आढळला उंदिरImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Aug 16, 2023 | 3:20 PM
Share

मुंबई / 16 ऑगस्ट 2023 : कधी तरी स्वयंपाकातून आराम म्हणून किंवा काही सेलिब्रेशननिमित्त प्रत्येक जण हॉटेलमध्ये जात असतो. पण ज्या हॉटेलवर आपण विश्वास ठेवतो ते खरोखरच आपल्या ग्राहकांची काळजी घेतात का संशोधनाचा विषय आहे. वांद्र्यातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका जोडप्याने या हॉटेलमध्ये चिकन, मटण ऑर्डर केले होते. मात्र ऑर्डर आल्यानंतर समोरील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. चिकणच्या थाळीत त्यांना चक्क उंदराचं पिल्लू आढळलं. यानंतर संतापलेल्या जोडप्याने वांद्रे पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

वांद्र्यातील प्रसिद्ध रेस्टॉरंटध्ये घडली घटना

फिर्यादी अनुराग सिंग हे आपल्या पत्नीसह वांद्र्यातील पाली नाका येथील प्रसिद्ध रेस्टॉरंट पापा पान्चो रेस्टॉरंटमध्ये 13 ऑगस्ट रोजी जेवायला गेले होते. त्यांनी रोटी, चिकन आणि मटण थाळी ऑर्डर केली. जेवताना त्यांना एक मांसाचा तुकडा समोर आला, जो वेगळा दिसत होता. मात्र निरखून पाहिले असता ते उंदराचं छोटं पिल्लू होतं. यानंतर अनुराग सिंग यांनी वांद्रे पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.

सिंग यांच्या फिर्यादीवरुन वांद्रे पोलिसांनी कलम 272 (विक्रीच्या उद्देशाने अन्न किंवा पेय पदार्थात भेसळ करणे), 336 (जीव धोक्यात आणणारे कृत्य) आणि 34 (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल केला. वांद्रे पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.  या घटनेवरुन हॉटेलमधील अन्न सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच