
मुंबई : मुंबईच्या कांदिवली पोलिसांनी एका दागिन्यांच्या दुकानात दरोडा घालण्यापूर्वीच फिल्मी स्टाईलने चोरट्याला अटक केली आहे. चोर पोलिसांच्या अटकेचे थेट चित्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
ही घटना कांदिली पश्चिम फाटक रोडवर असलेल्या मोनिका ज्वेलर्सची आहे. 18 ऑक्टोबरच्या रात्री 2 वाजून 20 मिनिटांनी पोलिसांना बातमी मिळाली की काही लोक मोनिका ज्वेलर्सचे छप्पर तोडून ज्वेलर्स दुकान लुटत आहेत. बातमी मिळताच कांदिवली पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहचले आणि चोरांना चारही बाजूंनी घेरले.
पोलीस आरोपींना वारंवार शरण येण्याची विनंती करत राहिले, परंतु चोर पोलिसांसमोर हजर होण्यास तयार नव्हते. पोलीस आणि चोर यांच्यात तासनतास वाद झाल्यानंतर अचानक एका चोराने छतावरुन उडी मारली आणि पळून जाऊ लागला. तेव्हा पोलीस पथकाने त्याला फिल्मी स्टाईलने रस्त्यावर धावताना पकडले, तर त्याचा एक साथीदार पळून गेला.
या घटनेचे थेट छायाचित्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते की चोर वरुन खाली उडी मारतो आणि उठतो आणि पळू लागतो. तर मुंबई पोलिसांचे पथक त्यांच्या मागे धावताना दिसतात.
Kandiwali Police Arrest Thief
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील चोरट्याला पकडण्यासाठी पोलिसांकडून एक राऊंड हवाई फायरिंगही करण्यात आली. अटक केलेल्या आरोपीचे नाव सोनू जयस्वाल आहे. त्याचे वय 24 वर्षे आहे. त्याच्यावर मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यात आधीच अनेक गुन्हे दाखल आहेत.
फरार झालेल्या आरोपीचे नाव रवी यादव आहे. कांदिवली पोलिसांच्या पथकाकडून त्याचा शोध सुरु आहे. पोलिसांनी या आरोपींकडून गॅस कटर, स्क्रूड्रायव्हर, हातोडा अशा अनेक वस्तू जप्त केल्या आहेत. सध्या कांदिवली पोलीस आरोपींना अटक करत पुढील तपास करत आहेत.
पाहा व्हिडीओ :
लहान मुलांचं रक्त प्यायचा हा ‘ड्रॅक्युला’, पोलिसांना चकवून पळाला, जमावाने ठेचून मारला https://t.co/arYr94bj6d #Dracula | #Crime | #SerialKiller | #Murder
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 19, 2021
संबंधित बातम्या :
पत्नीसह दोघांची हत्या, जन्मठेप भोगणारा वृद्ध पॅरोलवर बाहेर, पुन्हा एकाचा धारदार शस्त्राने खून
धारदार शस्त्राने सपासप वार, कोल्हापुरात निर्घृण हत्याकांड, अल्पवयीन मुलांसह सहा जण जेरबंद