धारदार शस्त्राने सपासप वार, कोल्हापुरात निर्घृण हत्याकांड, अल्पवयीन मुलांसह सहा जण जेरबंद

शुभम बाळासो काणे (वय 24 वर्ष), निखिल चंद्रकांत माने (वय 21 वर्ष), विपुल आप्पासो नाईक (वय 20 वर्ष), अभिषेक राजू आसाल (वय 21 वर्ष) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

धारदार शस्त्राने सपासप वार, कोल्हापुरात निर्घृण हत्याकांड, अल्पवयीन मुलांसह सहा जण जेरबंद
कोल्हापुरात निर्घृण हत्या

इचलकरंजी : धारदार शस्त्राने संतोष श्रीकांत जाधव (वय 42 वर्ष, रा. जवाहरनगर) यांचा निर्घृण खून करणाऱ्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले. टोळीतील सहा जण कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज परिसरात सापडल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक बाबुराब महामुनी यांनी दिली. शनिवारी रात्री सशस्त्र हल्ला करुन संतोष जाधवांची हत्या करण्यात आली होती.

कोणाकोणाला अटक

शुभम बाळासो काणे (वय 24 वर्ष), निखिल चंद्रकांत माने (वय 21 वर्ष), विपुल आप्पासो नाईक (वय 20 वर्ष), अभिषेक राजू आसाल (वय 21 वर्ष) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्या चौघा जणांना न्यायालयाने 25 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

9 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

शनिवारी रात्री जवाहरनगर परिसरात शुभम काणे, आदित्य सुतार यांच्यासह 9 जणांनी संतोष जाधव यांच्यावर सशस्त्र हल्ला केला. धारदार शस्त्रांनी सपासप वार करुन त्याचा खून करण्यात आला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात राजु बंडगर याच्या फिर्यादीनुसार शुभम काणे, आदित्य सुतार यांच्यासह 9 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.

15 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी

संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली. रविवारी रात्री खून प्रकरणातील चार जणांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आणि दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. अटक केलेल्या चौघा जणांना न्यायालयात हजर केले असता 15 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यासंदर्भात कोल्हापूरचे पोलीस महासंचालक मनोज लोहिया, एसपी शैलेश बलकवडे, एडीएसपी जयश्री गायकवाड इचलकरंजी येथे दाखल झाले होते. दरम्यान इचलकरंजी शहरात गुन्हेगारी प्रमाणत वाढ होत आहे. त्यामुळे गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, तसेच इतर गुन्हेगारांवर मोक्का कायद्याच्या अंतर्गत कारवाई देखील करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

संबंधित बातम्या :

वसईत पोलिसांची दादागिरी; दुकानात शिरुन दुकानदाराला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

यॅक यॅक, ईsss तुमचा आवडता समोसा कसा बनवला जातोय बघा, कल्याणच्या हॉटेलचा Video व्हायरल

डॉ. राजन शिंदेंचं नेमकं काय झालं? एका रक्तांकित खुनाचा चक्रावून टाकणारा घटनाक्रम, घराला आरसा दाखवणारी घटना

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI