VIDEO | वसईत पोलिसांची दादागिरी; दुकानात शिरुन दुकानदाराला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

वसईत साध्या वेशातील पोलिसांची दादागिरी समोर आली आहे. दुकानासमोर भांडण करणाऱ्या फेरीवाल्यांना जाब विचारणाऱ्या एका कपडा व्यापाऱ्याला दुकानात शिरुन एका पोलिसाने धक्काबुक्कीकरुन, थापड, बुक्याने मारहाण केली असल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या मारहाणीत पोलिसाची पत्नी आणि मित्राचा ही समावेश असल्याचे पोलीस तक्रारीत उघड झाले आहे.

VIDEO | वसईत पोलिसांची दादागिरी; दुकानात शिरुन दुकानदाराला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद
Vasai Shop Keeper Beat


वसई : वसईत साध्या वेशातील पोलिसांची दादागिरी समोर आली आहे. दुकानासमोर भांडण करणाऱ्या फेरीवाल्यांना जाब विचारणाऱ्या एका कपडा व्यापाऱ्याला दुकानात शिरुन एका पोलिसाने धक्काबुक्कीकरुन, थापड, बुक्याने मारहाण केली असल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या मारहाणीत पोलिसाची पत्नी आणि मित्राचा ही समावेश असल्याचे पोलीस तक्रारीत उघड झाले आहे.

ही घटना 17 ऑक्टोबर रोजी रात्री 8.45 च्या सुमारास घडली आहे. याबाबत मारहाण करणारा पोलीस, त्याची पत्नी आणि त्याच्या एका मित्रावर माणिकपूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. या घटनेने व्यापारी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत असून, पोलिसांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

नेमकं प्रकरण काय?

वसईतील पश्चिम आनंद नगर परिसरात सत्यम मॅचिंग सेंटर नावाचे कपड्याचे दुकान आहे. या दुकानासमोर 17 ऑक्टोबर रोजी रात्री 8.45 च्या सुमारास फेरीवाल्यांचे भांडण सुरू होते. दुकानासमोर भांडण चालू असल्याने, दुकानदार जयेश माळी यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला.

पण यात पोलिसांचा काहीएक संबंध नसताना वसई पोलीस ठाण्याच्या लोंढे नावाच्या पोलीस हवालदाराने दुकानात शिरून, तू फेरीवाल्यांना धक्का का मारालास हे कारण देत जयेश माळी यांना धक्काबुक्की करत मारहाण केली आहे. आपल्या वडिलांना मारतात हे लक्षात आल्यावर दुकानंदाराचा मुलगा सोडवायला गेला तर त्याला ही पोलिसाने मारहाण केली आहे.

या मारहाणीत लाल रंगाचे शर्ट घातलेला लोंढे नावाचा पोलीस, त्याची पत्नी आणि काळ्या रंगाचा शर्ट घातलेला त्याचा अनोळखी मित्र यांनी ही मारहाण केली आहे. मारहाणीची घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद होऊन सुद्धा पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून घेतला नाही, शेवटी पोलीस आयुक्तांना मॅसेज पाठवल्यावर अदखल पात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

मारहाण करणारे लोंढे नावाचे पोलीस हे पूर्वी माणिकपूर पोलीस ठाण्यात कार्यरत होते आणि आता वसई पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. ते फेरीवाल्यांचे पैसे (हप्ता) गोळा करीत होता आणि त्याच फेरीवाल्यांची बाजू घेऊन काहीएक कारण नसताना त्याने मारहाण केली असल्याचा आरोप व्यापाऱ्याने केला आहे. व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून पोलीस लोंढे, त्यांची पत्नी, आणि त्यांचा काळे शर्ट घातलेला मित्र अशा तिघांवर माणिकपूर पोलीस ठाण्यात कलम 323, 504, 506 प्रमाणे अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

पाहा व्हिडीओ – 

संबंधित बातम्या :

नागपुरात रेशनच्या धान्याची चोरी, तब्बल 26 लाखांचा मुद्देमाल जप्त, पोलिसांनी डाव हाणून पाडला

Viral Video | विद्यार्थ्याचे केस पकडून शिक्षकाची लाथाबुक्क्यांनी मारहाण, वर्गातील मुलांकडून व्हिडीओ रेकॉर्ड

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI