मुलगा आणि आईमध्ये वाद झाला; मद्यधुंद मुलाने आईचा गळा दाबला

वैशाली धनू या मुलगा देवांशसोबत राहत होती. मंगळवारी रात्री मुलगा आणि आईमध्ये काही कारणावरून भांडण झाले.

मुलगा आणि आईमध्ये वाद झाला; मद्यधुंद मुलाने आईचा गळा दाबला
| Edited By: | Updated on: Mar 10, 2023 | 8:13 AM

विरार : विरारमध्ये एक २३ वर्षीय मुलाने ओढणीच्या साह्याने आपल्या आईची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच विरार पोलीस घटनास्थळी पोहचले. आरोपी मुलाला अटक करण्यात आली. विरारच्या फुलपाडा येथील गांधीनगर परिसरात ही घटना घडली. वैशाली धनू या मुलगा देवांशसोबत राहत होती. मंगळवारी रात्री मुलगा आणि आईमध्ये काही कारणावरून भांडण झाले. त्यानंतर गुरुवारी रात्री मद्यधुंद मुलाने ओढणीने गळा दाबून आईची हत्या केली. या भांडणाची माहिती वैशाली यांनी त्यांच्या आईला फोन करून दिली होती. तिची आई गुरुवारी दुपारी घरी आली असता त्यांना मृतदेह बेडरुममध्ये पडलेला दिसला. चार-पाच दिवसांपूर्वी आई व मुलगा लग्नाला गेले होते. या घटनेची नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यावेळीसुद्धा आई आणि मुलामध्ये भांडण झाले होते. याच रागातून मुलाने आईची हत्या केली.

भांडणाची माहिती महिलेने आईला दिली होती

विरारमध्ये 23 वर्षाच्या मुलाने आपल्याच आईची हत्या केल्याची घटना उघडं झाली आहे. विरार पूर्वेतील फुलपाडा येथील गांधीनगर या परिसरातील वक्रतुंड अपार्टमेंटमध्ये मद्यधुंद अवस्थेत आरोपी देवांश धनू हा घरी आला. बुधवारी रात्री 12 च्या सुमारास आपल्याच आईचा गळा दाबून खून केला आहे. बुधवारी रात्री मुलगा देवांश धनू आणि आई वैशाली धनू यांच्यामध्ये काही कारणावरून भांडण झालं होतं. त्यानंतर संतापलेल्या मुलाने आपल्याच आईचा गळा दाबून खून केला. मयत वैशाली हिने देवांशूशी झालेल्या भांडणाची माहिती आपली आई रेवती म्हात्रे हिला दिली होती.

आरोपी मुलाला अटक

गुरुवारी दुपारच्या सुमारास वैशालीची आई रेवती म्हात्रे घरी आली असता, तिला वैशालीचा मृतदेह बेडरुममध्ये पडलेला दिसून आला. त्यानंतर मयत वैशालीच्या आईने तात्काळ विरार पोलीसांना माहिती दिली. विरार पोलिसांनी घटनास्थली धाव घेत, मुलाला अटक केली आहे. सध्या मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. आरोपी मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.