Shocking: नवव्या मजल्यावरुन कोसळून कामगाराचा दुर्दैवी अंत! 3 मुलं आणि पत्नीचं छत्र हरपल्यानं हळहळ

| Updated on: Apr 20, 2022 | 8:06 AM

Nalasopara worker death: नवव्या मजल्यावर काम करत असताना या मजुराचा तोल गेला. तोल जाऊन थेट खाली कोसळलेल्या या मजुराचा जागीच दुर्दैवी अंत झाला.

Shocking: नवव्या मजल्यावरुन कोसळून कामगाराचा दुर्दैवी अंत! 3 मुलं आणि पत्नीचं छत्र हरपल्यानं हळहळ
नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

पालघर : नवव्या मजल्यावरुन पडून मजुराचा दुर्दैवी अंत (worker killed after falling from ninth floor) झाला आहे. ही दुर्दैवी घटना नालासोपाऱ्यात घडली. या घटनेनं सगळ्यांनाच धक्का बसला आहे. एका इमारतीचं नालासोपाऱ्यात (Nalasopara Building) बांधकाम सुरु होतं. तिथे हा मजूर काम करत होता. नवव्या मजल्यावर काम करत असताना या मजुराचा तोल गेला. तोल जाऊन थेट खाली कोसळलेल्या या मजुराचा जागीच दुर्दैवी अंत झाला. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली होती. मंगळवारी नालासोपाऱ्यात ही दुर्दैवी घटना घडली. या कामगाराच्या मृत्यूनं इतर बांधकाम इमारतीत काम करणारे इतर कामगारही (Construction workers of Building) धास्तावलेत. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास प्लाय जोडण्याचं काम करत असताना हा काम नवव्या मजल्यावरुन थेट खाली कोसळला. दरम्यान, या बांधकाम कामगाराच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या कामगाराच्या पश्चात त्यांची दोन मुलं, एक मुलगी आणि पत्नी असा परिवार आता पोरका झालाय.

..अशी घटली घटना!

नालासोपारा पूर्वेला एका इमारतीचं बांधकाम सुरु होतं. नालासोपारा पूर्वेला आचोले रोड इथं ए.व्ही. क्रिस्टल ही निर्माणाधीन इमारत आहे. या इमारतीत वेगवेगळ्या प्रकारची कामं सुरु होती. सखाराम बिराजदार हा बांधकाम कामगारही या ठिकाणी काम करत होता.

सखाराम बिराजदार हा नवव्या मजल्यावर इमारतीच्या डकमध्ये होता. तिथं तो प्लाय जोडण्याचं काम करत होता. मात्र यावेळी त्याचा काम करत असतानाच तोल गेला. तोल जाऊन सखाराम बिराजदार हा थेट खाली कोसळला. यात सखाराम याचा जागीच जीव गेला. सखाराम बिराजदार या मृत बांधकाम कामगाराचं वय 39 वर्ष होतं. त्याच्या मृत्यूमुळे बांधकाम करणारे इतर कामगारही धास्तावले आहेत. दरम्यान, इमारतीचं मालकानं बांधकाम कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं योग्य उपाययोजना न केल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली, असा आरोप केला जातो आहे.

कुटुंब पोरकं!

39 वर्षीय सखाराम बिराजदार यांच्या अपघाती मृत्यू त्याचं कुटुंब पोरकं झालंय. सखाराम यांच्या पश्चात त्यांची दोन मुलं, एक मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे. या सगळ्याचं छत्र सखारामच्या मृत्यूमुळे हरपलंय. आता या कुटुंबासमोर पुढे काय करायंच, असा प्रश्न उभा ठाकलाय.

संबंधित बातम्या :

नाशिक येथील सोमेश्वर धबधब्यावर दोघे बुडाले, धबधब्याच्या पाण्यात पोहणं जीवावर बेतलं!

साताऱ्यात हनीट्रॅपद्वारे तरुणांना जाळ्यात अडकवून खंडणी मागणाऱ्या जोडप्याचा पर्दाफाश

Badlapur CCTV: दिवसाढवळ्या दुकानात शिरला, दुकानाचील ड्रॉव्हरमधून 1 लाख 20 हजार चोरुन पोबारा