नवाब मलिकांना सडेतोड उत्तर, समीर वानखेडे म्हणतात, ही तर माझ्या बहिणीची जासूसी करतायत !

| Updated on: Oct 21, 2021 | 8:37 PM

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांवर मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेत सडेतोड उत्तर दिलं. आमच्या कार्यालयीन कामकाजांवरुन वैयक्तिक पातळीवर खालच्या पातळीत आणि घाणेरडे आरोप केले जात असल्याचं वानखेडे यांनी म्हटलं.

नवाब मलिकांना सडेतोड उत्तर, समीर वानखेडे म्हणतात, ही तर माझ्या बहिणीची जासूसी करतायत !
एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे
Follow us on

मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांवर मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेत सडेतोड उत्तर दिलं. आमच्या कार्यालयीन कामकाजांवरुन वैयक्तिक पातळीवर खालच्या पातळीत आणि घाणेरडे आरोप केले जात असल्याचं वानखेडे यांनी म्हटलं. मलिकांनी आपल्या मृत आईवर, निवृत्त वडिलांवर आणि बहिणीवर चुकीचे आणि गंभीर आरोप केले. त्यांचं मी खंडन करतो. तसेच त्यांनी बहिणीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर जाऊन जासूसी केली, असं देखील समीर वानखेडे आक्रमकपणे म्हणाले.

समीर वानखेडे नेमकं काय म्हणाले?

“त्यांनी केलेले आरोप प्रोफेशनलिझम असतील तर मला त्यावर काहीच आक्षेप नाही. एका मृत महिलेवर तुम्ही आरोप करत आहात. माझी बहीण जी लहान मुलांची आई आहे, तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर जाऊन तुम्ही तिची जासूसी करत आहात. एक वृद्ध माजी सैनिकावर आरोप करत आहात. कशासाठी? तर जे देशासाठी काम करत आहेत त्याच्यावरुन. आम्ही जे प्रोफेशनल काम करत आहोत, कारवाईवरुन तुम्ही वैयक्तीक टार्गेट करत आहात. पण यातून माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. माझे मनौधैर्य खालवणार नाही”, असं समीर वानखेडे रोखठोकपणे म्हणाले.

‘देशाची सेवा केली म्हणून जेलमध्ये टाकत असतील तर मी त्याचं स्वागत करतो’

“वारंवार गेल्या 15 दिवसांपासून माझी मृत आई, माझे निवृत्त वडील आणि बहिणीवर घाण शब्दांमध्ये टीका केली जात आहे. मी या गोष्टीचं खंडन करतो. ते खूप मोठे मंत्री आहेत. त्यांना लोकांचा अपमान करण्याचा कदाचित अधिकार असू शकतो. पण मी खूप लहान सरकारी कर्मचारी आहे. मी माझं काम करतोय. जर देशाची सेवा करण्यासाठी आणि अँटीड्रग्ज ऑपरेशन करण्यावरुन जेलमध्ये टाकत असतील तर मी त्याचं स्वागत करतो”, अशी भूमिका त्यांनी मांडली.

‘दुबईला गेल्याची माहिती अतिशय चुकीची’

“ते दुबईत गेल्याचं बोलत आहे. मी या गोष्टीची घोर निंधा करतो. ही चुकीची माहिती आहे. जी तारीख ते सांगत आहेत, डिसेंबर महिन्यात मी त्यावेळी मुंबईत होतो. ते या गोष्टीचा तपास किंवा शहानिशा करु शकतात. हा चुकीचा आरोप आहे. त्यांनी ट्विट केलेले फोटो मुंबईचे आहेत. जे खंरय ते खरं आहे. विमानतळाकडून तुम्ही माहिती घेऊ शकतात. याशिवाय पासपोर्ट, विझा या सगळ्या गोष्टी लागतात. मग वेरिफाय करुन बघा”, असं आवाहन वानखेडे यांनी केलं.

‘मी एनसीबीत येण्यासाठी 2019 मध्ये अर्ज केलेला’

“खंडणी हा खूप घाणेरडा आणि खालच्या पातळीचा शब्द आहे. मी मालदीवला गेलो होतो. मी माझ्या वरिष्ठांची, सरकारची परवानगी घेऊन आपल्या मुलांसोबत गेलो होतो. त्याला तुम्ही खंडणी म्हणत होते, हे चुकीचे आहे. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. मी एक छोटा सरकारी कर्मचारी आहे. ते खूप मोठे मंत्री आहेत. देशसेवा करण्यावरुन, ड्रग्ज हटवण्यावरुन ते मला जेलमध्ये टाकत असतील तर मी त्यांचं स्वागत करतो”, असंदेखील ते यावेळी म्हणाले. “मी एनसीबीत येण्यासाठी 2019 मध्ये अर्ज केला होता. जेव्हा ड्रग्ज प्रकरण माझ्याकडे नव्हतं. त्यांची केस एक वर्षापासून सुरु होती. ते जे कनेक्शन लावत आहेत त्याची मी निंदा करतो”, अशी रोखठोक भूमिका त्यांनी मांडली.

नवाब मलिक यांचे आरोप काय?

मुंबई ड्रग्स प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आता एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना जाहीर कार्यक्रमात इशारा दिलाय. मावळमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला. त्यावेळी बोलताना समीर वानखेडेला वर्षभरात तुरुंगात टाकणार, असं खुलं आव्हान देतो. वर्षभरात तुझी नोकरी जाईल, तुझा तुरुंगवास निश्चित आहे, असं वक्तव्य मलिक यांनी जाहीर कार्यक्रमात केलंय.

‘समीर वानखेडेला वर्षभरात तुरुंगात टाकणार असं खुलं आव्हान देतो. वर्षभरात तुझी नोकरी जाईल. तुझा तुरुंगवास निश्चित आहे. राज्याती जनता पाहतेय. वानखेडेची बोगसगिरी समोर जनतेसमोर आणणार. त्याचा बाप बोगस होता, हा बोगस आहे, याच्या घरातील सगळे बोगस आहेत. माझ्या जावयाला तुरुंगात टाकले आणि आता मला फोन करतो की यात माझं काही नाही. माझ्यावर दबाव होता. मग तुझ्यावर दबाव टाकणाऱ्या बापाचं नाव सांग. कोणत्या बापाच्या सांगण्यावरुन हे करतोय? तुझा बाप कोण याचं उत्तर दे. तुझ्या बापाला मी घाबरत नाही. तुला तुरुंगात टाकल्याशिवाय मी गप्प बसणार नाही’, असा घणाघात मलिक यांनी केलाय.

संबंधित बातम्या :

अनन्या पांडेची आजची चौकशी संपली, उद्या पुन्हा वानखेडेंसमोर हजेरी, नेमकं काय-काय घडलं?

नवाब मलिक म्हणाले, समीर वानखेडेची नोकरी जाणार, जेलमध्ये टाकणार, आता वानखेडेंचं थेट उत्तर