TET Exam scam | टीईटी परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी कुणालाही पाठिशी घातले जाणार नाही – शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड

टीईटी परीक्षेतील कथित गैरव्यवहार प्रकरणाबाबतच्या कायदेशीर कार्यवाहीसंदर्भात शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रकरणाचा आढावा घेतला.

TET Exam scam | टीईटी परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी कुणालाही पाठिशी घातले जाणार नाही - शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड
School Education Minister Prof. Varsha Gaikwad
| Edited By: | Updated on: Dec 17, 2021 | 7:01 PM

मुंबई- टीईटी परीक्षेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जर कोणी खेळ करत असेल तर तो अजिबात खपवून घेतला जाणार नाही. जो कुणी दोषी आढळेल त्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. कुणालाही पाठिशी घातले जाणार नाही, असे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित
टीईटी परीक्षेतील कथित गैरव्यवहार प्रकरणाबाबतच्या कायदेशीर कार्यवाहीसंदर्भात शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रकरणाचा आढावा घेतला. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून या समितीद्वारे संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर केला जाईल. या अनुषंगाने कायदेशीर प्रक्रियेत शालेय शिक्षण विभागाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे प्रा.गायकवाड यांनी म्हटले आहे.

यांना केली अटक

‘टीईटी’ परीक्षेतला घोटाळ्याप्रकरणी पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचा अध्यक्ष तुकाराम सुपे सह सल्लागार अभिषेक सावरीकर यांना बेड्या ठोकल्या आहेत. इतकच नव्हे तर त्यांच्या घराची झडती ही घेतली त्यामध्ये 90 लाख रुपयांच्या रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने व एफडी केलेल्या पावत्याही जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये आणकाही काही कनेक्शन उघड होण्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली.

TET Exam scam | आरोपी घोटाळा करताना वापरायची ही Modus operandi.. ; पोलिसांनी उघड केली माहिती

अवकाळीचा परिणाम : द्राक्ष बागा वाचवण्यासाठी एकरी 20 हजाराचा खर्च, शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

केस धुतल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी चिकट होतात? मग हा सोपा उपाय करा आणि दिसा सुंदर