अवकाळीचा परिणाम : द्राक्ष बागा वाचवण्यासाठी एकरी 20 हजाराचा खर्च, शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

चार दिवसाचा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांना किती महागात पडलेली आहे त्याचा प्रत्यय आता येऊ लागला आहे. द्राक्ष बागांचे विदारक चित्र पाहून आता त्या वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. वर्षभर बागा जोपासण्यासाठी लाखोंचा खर्च करुन आता अंतिम टप्प्यत असलेल्या बागा वाचवण्यासाठी द्राक्ष बागायत शेतकऱ्यांना एकरी 15 ते 20 हजाराचा अतिरिक्त करावा लागणार आहे.

अवकाळीचा परिणाम : द्राक्ष बागा वाचवण्यासाठी एकरी 20 हजाराचा खर्च, शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 17, 2021 | 4:42 PM

नाशिक : चार दिवसाचा ( Untimely rains) अवकाळी पाऊस शेतकऱ्यांना किती महागात पडलेली आहे त्याचा प्रत्यय आता येऊ लागला आहे.  (damage to vineyards) द्राक्ष बागांचे विदारक चित्र पाहून आता त्या वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. वर्षभर बागा जोपासण्यासाठी लाखोंचा खर्च करुन आता अंतिम टप्प्यत असलेल्या बागा वाचवण्यासाठी द्राक्ष बागायत शेतकऱ्यांना एकरी 15 ते 20 हजाराचा अतिरिक्त करावा लागणार आहे. कारण पाऊस आणि त्यानंतर वातावरणातील बदलामुळे मणीगळ, घडकुज या समस्या निर्माण झाल्या आहेत. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने एकट्या नाशिक जिल्ह्यातील दीड लाख एकरावरील पिकांना फटका बसला होता. आता खर्चाअभावी बागा सोडून दिल्या तर वर्षभराची मेहनत आणि पैसा वाया जाणार आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नाजूक झाल्याने खर्च करायचा कसा असा सवाल उपस्थित होत आहे.

कृषी विभागाचा अहवाल जाहीर

नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे आदेश कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले होते. त्यानुसार नाशिक जिल्हा प्रशासनाच्यावतीने अहवाल सादर करण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्यात 1 लाख 54 हजार एकरावर द्राक्ष लागवड करण्यात आलीची नोंद आहे तर 26 हजार 500 एकरावरील द्राक्षांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. द्राक्षांच्या घडामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. तर आता फवारणीशिवाय शेतकऱ्यांकडे पर्यायच उरलेला नाही.

डाऊनीचा वाढतोय प्रादुर्भाव

पावसानंतर वातावरणातील बदलामुळे घडकुज तर होतच आहे पण नविन पानांच्या फुटीमध्ये डाऊनीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. डाऊनीचे व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांचा खर्च वाढला आहे. वर्षभर द्राक्ष जोपासण्यासाठी शेतकऱ्यांना आगोदरच 8 ते 10 फवारण्या कराव्या लागल्या आहेत. यातच बागा अंतिम टप्प्यात असताना अवकाळी पाऊस व त्यानंतर निर्माण झालेली स्थिती ही शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी आहे.

डाऊनी मिल्ड्यू चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी असे करा व्यवस्थापन

या रोगाचा परिणाम थेट द्राक्षांच्या घडावर होत आहे. त्यामुळे वेळेत उपाययोजना केली नाही तर थेट द्राक्ष तोडून फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. हे नुकसान टाळाव्यासाठी अमिसूलब्रोम 17.7 % एस.सी. या स्पर्शजन्य बुरशीनाशकाची 0.38 मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी. किंवा डायमिथोमॉर्फ 50 डब्ल्यू.पी. 0.50 ग्रॅम प्रति 1 लिटर किंवा मॅडीप्रोपॅमीड एस . सी. 0.8 मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून बुरशीनाशकांचाही वापर करता येईल.

संबंधित बातम्या :

…अखेर आठवडाभराने शेतकऱ्यांना मिळाला दिलासा, सोयाबीनच्या दरामध्ये असा काय बदल झाला? जाणून घ्या

शेतकऱ्यांना दिलासा ग्राहकांना मात्र लाल मिरचीचा ठसका, नंदुरबार मुख्य बाजारपेठेत विक्रमी दर

निर्णय झाला आता दरही ठरणार, द्राक्ष बागायत संघाकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.