…अखेर आठवडाभराने शेतकऱ्यांना मिळाला दिलासा, सोयाबीनच्या दरामध्ये असा काय बदल झाला? जाणून घ्या

सर्वकाही पोषक असतानाही गेल्या आठ दिवसांपासून सोयाबीनचे दर हे स्थिर राहत होते किंवा त्यामध्ये घसरण होत होती. अखेर आठ दिवसांनी का होईना सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली आहे. शुक्रवारी दर कमी तर झाले नाहीत पण यामध्ये 300 रुपयांनी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.

...अखेर आठवडाभराने शेतकऱ्यांना मिळाला दिलासा, सोयाबीनच्या दरामध्ये असा काय बदल झाला? जाणून घ्या
सोयाबीन हे खरीप हंगामातील मुख्य पीक आहे. पुन्हा सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
Follow us
| Updated on: Dec 17, 2021 | 3:50 PM

लातूर : सर्वकाही पोषक असतानाही गेल्या आठ दिवसांपासून सोयाबीनचे दर हे स्थिर राहत होते किंवा त्यामध्ये घसरण होत होती. अखेर आठ दिवसांनी का होईना सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली आहे. शुक्रवारी दर कमी तर झाले नाहीत पण यामध्ये 300 रुपयांनी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. कारण सोयापेंडच्या आयातीला पूर्णविराम मिळाला असताना देखील दरात वाढ होत नव्हती उलट घसरण सुरु होती. एकीकडे आवक वाढत असताना दर घटत असल्याने नेमका काय निर्णय घ्यावा या द्विधा मनस्थितीमध्ये शेतकरी होते. शुक्रवारच्या दरामुळे काहीशा प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे.

सोमवार पासून सोयाबीनचे दोन सौदे

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन आणि बियाणेसाठी वापरले जाणारे सोयाबीन या दोन्हीची आवक सुरु झाली आहे. आगामी हंगामाची तयारी आतापासूनच सुरु झाली आहे. बियाणाच्या सोयाबीनला 7 हजार रुपये क्विंटल दर मिळत आहे तर नियमित असलेल्या सोयाबीनच्या दरात शुक्रवारी 300 रुपयांनी वाढ झाली आहे. आता सोमवारपासून नियमित सोयाबीन आणि बियाणांसाठी वापरले जाणारे सोयाबीन यांचे वेगवेगळे सौदे होणार आहेत. शुक्रवारी आवक कमी झाली असली तरी दरात वाढ झाली आहे. आतापर्यंत आवक अधिकेची होत होत तर दर कमी आता मात्र, आवक कमी झाली आणि दर हे वाढले असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

बाजारपेठेत रेलचेल वाढली

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या सोयाबीन, तूर तसेच सोयाबीन बियाणेची आवक ही वाढलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून केवळ सोयाबीनची आदक सुरु होती. आता खरीप हंगामातील तुरही बाजारात दाखल झाली आहे. त्यामुळे रेलचेल वाढली असून सोयाबीनच्या दरात अणखीन वाढ होण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. अजूनही अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केलेली आहे. आता उन्हाळी सोयाबीन दाखल होण्यापूर्वी खरीपातील सोयाबीनला अपेक्षित दर मिळाला तर झालेले नुकसान भरुन निघणार आहे.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. शुक्रवारी लाल तूर- 6400 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6150 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6200 रुपये क्विंटल, जानकी चना 4925 रुपये क्विंटल, विजय चणा 4850, चना मिल 4750, सोयाबीन 6500, चमकी मूग 7200, मिल मूग 6150 तर उडीदाचा दर 7450 एवढा राहिला होता.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांना दिलासा ग्राहकांना मात्र लाल मिरचीचा ठसका, नंदुरबार मुख्य बाजारपेठेत विक्रमी दर

निर्णय झाला आता दरही ठरणार, द्राक्ष बागायत संघाकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष

तूर आयातीमुळे हमीभावापर्यंतही पोहचले नाहीत दर, काय राहणार खरिपातील शेवटच्या पिकाचे भवितव्य

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.