Palghar : एसटी बस 25 फूट खोल दरीत कोसळली! पालघरमध्ये भीषण अपघात, 20 जण गंभीर जखमी

Palghar Accident News : बस चालक दारु पिऊन बस चालवत असल्याचा आरोप काही प्रवाशांनी केलाय. दरम्यान, सध्या अपघातातील जखमींना पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

Palghar : एसटी बस 25 फूट खोल दरीत कोसळली! पालघरमध्ये भीषण अपघात, 20 जण गंभीर जखमी
पालघरमध्ये भीषण अपघातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 27, 2022 | 8:11 AM

पालघर : पालघर (Palghar Accident News) येथील वाघोबा खिंडीत एस टी (ST Bus Accident) महामंडळाच्या रातराणी बसचा भीषण अपघात झाला. भुसावळ ते बोईसर या एसटी बसचा पालघर खिंडीत अपघात होऊन ही एसटी बस थेट दरीत कोसळली. बस चालकचे नियंत्रण सुटल्याने बस 20 ते 25 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात बसमधील 15 ते 20 जण गंभीर जखमी झालेत. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. बस चालक दारु पिऊन बस चालवत असल्याचा आरोपा काही प्रवाशांनी केलाय. दरम्यान, सध्या अपघातातील जखमींना पालघरच्या (Palghar News) ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

नेमकं काय घडलं?

रातराणी बस सेवेअंतर्गत एसटी महामंडळाकडून विशेष बस सेवा चालवली जाते. दरम्यान, भुसावळ-बोईसर या मार्गावरील एसटी बसचा सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या अपघातानंतर एसटी बसमधील प्रवाशांना चालकावर गंभीर आरोप केले आहेत.

पाहा व्हिडीओ :

हे सुद्धा वाचा

नाशिक मध्ये बदललेला चालक

भुसावळ-बोईसर मार्गावर वाघोबा खिंडीत एसटी बस आली असता चालकाचं नियंत्रण सुटलं आणि एसटी थेट 20 ते 25 फूट खोल दरीमध्ये कोसळली. दरम्यान, त्याआधी नाशकात या बसचा चालक बदलण्यात आला होता. बदलण्यात आलेल्या चालकानं दारुचं सेवन केलं असल्याचा आरोप प्रवाशांनी केला होता. याबाबत कंडक्टरकडे तक्रारही करण्यात आली होती. मात्र मद्यधुंद चालकाबाबतच्या तक्रारींकडे कंडक्टरने दुर्लक्ष केलं असल्याचं प्रवाशांचं म्हणणंय.

पाहा व्हिडीओ :

नशेत असलेल्या बस ड्रायव्हरने वेगाने गाडी चालवली होती. भयंकर पद्धतीनं बस चालवत असलेल्या या चालकाचं अखेर वाघोबा खिंडीत नियंत्रण सुटलं आणि त्यामुळेच हा अपघात घडला, असा आरोप जखमी प्रवाशांनी केलाय.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.