AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावरुन सिनेस्टाईल उडी मारुन फरार! रात्री जंगलात, मै यहाँ, तू कहाँ…

पोलिसांच्या ताब्यात असतानाच चोर त्याच्या तावडीतून निसटला आणि पुढे घडला चोर-पोलीस थरार

पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावरुन सिनेस्टाईल उडी मारुन फरार! रात्री जंगलात, मै यहाँ, तू कहाँ...
चोर पोलिसांचा थरारImage Credit source: TV9 Marathi
Reporter Mohmmad Hussain Khan
Reporter Mohmmad Hussain Khan | Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Dec 05, 2022 | 9:56 AM
Share

पालघर : मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक चोर पोलिसांच्या तावडीतून निसटला. पण पोलिसांनी प्रयत्नांची शर्थ करत या चोराच्या मुसक्या पुन्हा एकदा आवळल्या आहेत. या चोराने पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावरुन सिनेस्टाईल उडी मारत धूम ठोकली होती. अंधाराचा फायदा उचलत चोर जंगलात पळून गेला होता. पण पोलिसांनी रात्री अक्खं जंगल पिंजून काढलं. अखेर कोपर गाव इथं आरोपीला पुन्हा एकदा पकडण्यात पोलिसांना यश आलं.

घरफोडी, मोबाईल चोरी, दरोडा, खुनाचा प्रयत्न करणा-या सराईत आरोपी मांडवी पोलिसांच्या ताब्यात होता. पण यावेळी पोलीस स्थानकातील खिडकीतून उडी मारून शनिवारी सायंकाळच्या सुमारास तो फरार झाला होता.

मांडवी पोलिसांनी अवघ्या 24 तासातच आरोपीला पुन्हा एकदा अटक केली आणि त्याला पोलीस स्थानकात आणलं. मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत या सराईत गुन्हेगारांवर अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांच्या तावडीतून सुटून पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात हा अडकल्या गेलेल्या चोराची पालघरमध्ये चर्चा रंगलीय.

या आरोपीचं नाव अब्दुल रेहमान ताहीर बडु असं आहे. पोलिसांनी त्याला बेड्या घालून दोरखंडाने बांधलेलं होतं. मिरा भाईंदर आणि वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होतं. अनेक दिवसांपासून पोलीस त्याच्या मागाव होते.

अब्दुल याने मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक घरफोडी केली होती. रोख रक्कम, एटीएम कार्ड, मोबाईल असा एकूण 19 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल त्याने चोरी केला होता. याप्रकरणी आरोपीला पेल्हार मधून मांडवी पोलिसांनी शनिवारी दिनांक 3 डिसेंबर रोजी मोठ्या शिताफीने अटक केली होती, अशी माहिती पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी दिली.

दरम्यान, शनिवारीच सायंकाळी साडे सात वाजल्याच्या दरम्यान आरोपीने मांडवी पोलीस ठाण्यात पोलिसांना चकवा दिला. बारा फूट उंच असलेल्या पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावरुन उडी मारली. यावेळी अंधाराचा फायदा घेत पोलीस ठाण्याच्या मागील जंगलामध्ये धूम ठोकली. मांडवी पोलिसांनी संपूर्ण रात्र जंगल परिसर पिंजून काढला होता. अखेर कोपर गावाच्या परिसरात आरोपी पोलिसांच्या पुन्हा एकदा हाती लागला. या आरोपीकडून पोलिसांनी पाच मोबाईल ताब्यात घेतले आहे. आता या आरोपीची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात असून पुढील तपास सुरु आहे.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?