अँटेलिया स्फोटक प्रकरण, माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना जेल की बेल?

| Updated on: Dec 16, 2022 | 4:48 PM

उद्योजक मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटीलियाबाहेर स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरे हत्याकांडमध्ये आरोपी असलेले प्रदीप शर्मा यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.

अँटेलिया स्फोटक प्रकरण, माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना जेल की बेल?
प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे
Image Credit source: google
Follow us on

मुंबई : एन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या जामिनावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे. मात्र न्यायालयाने जामिनावरील निर्णय राखून ठेवला आहे. यामुळे प्रदीप शर्मा यांना दिलासा मिळणार की नाही? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. उद्योजक मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटीलियाबाहेर स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरे हत्याकांडमध्ये आरोपी असलेले प्रदीप शर्मा यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांच्या जामिन अर्जावर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती आर्यन लोढा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. शर्मा यांच्या जामिनावरील निकाल हायकोर्टाने राखून ठेवला आहे.

शर्मा आणि वाझे यांच्याविरोधात दोन प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले

दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या जबाबात वाझे आणि शर्मा यांची भेट झाल्याचं कबूल केल्याचं एनआयएतर्फे मुंबई हायकोर्टात एएससी अनिल सिंग यांनी युक्तिवादात म्हटले. कॉल लोकेशनही एनआयएतर्फे कोर्टात सादर करण्यात आले. त्याचबरोबर त्याची पुष्टी करण्यासाठी दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच जबाब नोंदवण्यात आले.

शर्मा यांच्या वकिलाने एनआयएचा दावा खोडून काढला

मात्र एनआयएने केलेल्या दाव्याला प्रदीप शर्मा यांचे वकील आबाद पोंडा यांनी विरोध केला. एनआयएने सांगितलं की 4 साक्षीदार आहेत. यातील 2 तर पोलीस कर्मचारी आहेत. त्यांच्या साक्षीला ग्राह्य कसं मानणार ? असा युक्तिवाद अॅड. पोंडा यांनी केला.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले अॅड. पोंडा?

इतर दोघांच्या साक्षीत मोठी तफावत आहे. दोघंही वेगवेगळ्या वेळा सांगतायत. या साक्षी विश्वासार्ह नाही, असे पोंडा म्हणाले. तसेच 17 फेब्रुवारी 2021 रोजी प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांची भेट झाल्याचा दावा खोटा असल्याचेही पोंडा यांनी नमूद केले.

दोघांच्या जबाबानुसार प्रदीप शर्मा 9 ते 9:30 दरम्यान सांताक्रुझला होते. मात्र CDR लोकेशन नुसार शर्मा साऊथ मुंबईत होते. 17 फेब्रुवारी 2021 ला भेट झाल्याचा दावा एनआयए करत आहे, मात्र दोघांच्या लोकेशनमध्ये मोठी तफावत आहे हे स्पष्ट होतंय.

वाझे यांचे लोकेशन मस्जिद बंदर तर त्याचवेळी शर्मा यांचं रे रोड, शिवडी आणि चेंबूर परिसरात होतं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार मनसुखचे लोकेशन ऐरोलीत होते, ज्या जागी शर्मा कधी गेलेच नाहीत. म्हणजे हे जबाब विश्वासहार्य नाहीत, असा युक्तिवाद वकील आबाद पोंडा यांनी केला आहे.