वसई रेल्वे स्थानकावर गदारोळ, सराईत चोरट्याने संधी साधली, पण पोलिसांनी मुसक्या आवळल्या

| Updated on: Jul 08, 2021 | 2:46 PM

वसई रोड रेल्वे स्थानकावरील फलाटावरील सॅकबॅग चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक करण्यात वसई लोहमार्ग पोलिसांना यश आलं आहे (Thief arrested for stealing sackbag at Vasai railway station).

वसई रेल्वे स्थानकावर गदारोळ, सराईत चोरट्याने संधी साधली, पण पोलिसांनी मुसक्या आवळल्या
वसई रेल्वे स्थानकावर गदारोळ, सराईत चोरट्याने संधी साधली, पण पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Follow us on

वसई : वसई रोड रेल्वे स्थानकावरील फलाटावरील सॅकबॅग चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक करण्यात वसई लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीमला यश आले आहे. या चोरट्याकडून 1 लाख 39 हजार 836 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले आहे. अमेय गिरीश चेंबूरकर उर्फ बाब्या (वय 22) असे अटक चोरट्याचे नाव आहे. तो नालासोपारा पूर्वेतील अलकापुरी बिल्डिंग विजय नगर परिसरात राहतो (Thief arrested for stealing sackbag at Vasai railway station).

आरोपीने चोरी कशी केली?

वसई रोड रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 5 वर 3 जुलैला 4 ते 5 जणांची झटापट झाली होती. याच वेळेत फिर्यादी सफाळे आणि आशिष पटेल हे वाद सोडवण्यासाठी गेले. यावेळी सफाळे यांची बॅग गर्दीत पडली होती. हीच संधी साधून आरोपीने सॅकबॅग पळवली होती (Thief arrested for stealing sackbag at Vasai railway station).

पोलिसांनी कारवाई कशी केली?

बॅग चोरी झाल्याच्या लक्षात आल्यानंतर सफाळे यांनी तातडीने वसई रोड रेल्वे स्थानकात धाव घेतली. त्यांनी पोलीस ठाण्यात सर्व घडलेला प्रकार सांगितला आणि रितसर तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाचे चक्र फिरवले. यासाठी पोलिसांनी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीचा फायदा घेतला. संबंधित घटना सीसीटीव्हीत पूर्णपणे जसाचा तसा कैद झालेला होता. आरोपी सीसीटीव्हीत बॅग चोरताना स्पष्टपणे दिसत होता. त्यामुळे पोलिसांचं काम सोपं झालं. पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपीला बेड्या ठोकल्या.

आरोपीकडून गुन्ह्याची कबुली

रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीचा आधार घेऊन पोलिसांनी आरोपीला पकडून चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. अटक आरोपी कडून सोन्याच्या 2 चैन आणि मोबाईल असा 1 लाख 39 हजार 836 रुपयांचा मुद्देमाल ही जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा : 

आईची हत्या करुन अवयव भाजून खाल्ले, नराधम मुलाला फाशीची शिक्षा, कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदा फाशी

आई अभ्यासावरुन ओरडल्याचा राग, वसईत 12 वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या