कल्याण ते धुळे उबर बूक, कसारा घाटात ड्रायव्हरची हत्या, कार घेऊन आरोपी पसार

| Updated on: Aug 11, 2021 | 7:43 AM

उबर चालकाची हत्या करून कार चोरणाऱ्या दोन आरोपींना कल्याण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. महात्मा फुले पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आरोपींनी कल्याण ते धुळे या प्रवासासाठी उबर बूक केली होती.

कल्याण ते धुळे उबर बूक, कसारा घाटात ड्रायव्हरची हत्या, कार घेऊन आरोपी पसार
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

कल्याण : उबर चालकाची हत्या करून कार चोरणाऱ्या दोन आरोपींना कल्याण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. महात्मा फुले पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आरोपींनी कल्याण ते धुळे या प्रवासासाठी उबर बूक केली होती. धुळ्याकडे जाताना आरोपींनी चालकाची हत्या करुन, मृतदेह कसारा घाटात फेकला. पोलिसांनी आरोपींचा कसोशीने शोध घेऊन बेड्या ठोकल्या. अमृत गावडे असं हत्या झालेल्या उबर चालकाचं नाव आहे. अमृत हे नवी मुंबईतील ऐरोलीचे रहिवासी होते.

नेमका प्रकार काय?

राहुलकुमार गौतम आणि धर्मेंद्रकुमार उर्फ वकील गौतम यांच्यासह चौघांनी अमृत गावडे यांची उबर बूक केली होती. प्रवासासाठी त्यांनी आऊटस्टेशन अर्थात कल्याण ते धुळे असा मार्ग निवडला होता.

राहुल, धर्मेंद्र यांच्यासह विशाल गौतम, करण गौतम, बचई गौतम, अमन गौतम या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींनी धुळ्याकडे जाताना अमृत गावडे यांची गाडी कसारा घाटत रोखली. या सर्वांनी अमृत गावडे यांची हत्या करुन मृतदेह कसारा घाटात फेकला. महात्मा फुले पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

पोलिसांनी या प्रकरणी राहुलकुमार गौतम, धर्मेद्र्कुमार उर्फ वकील गौतम, विशालकुमार गौतम, करणकुमार गौतम, बचई गौतम, अमन गौतम या आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या घटनेने खळबळ माजली आहे.

संबंधित बातम्या  

मनाच्या आडोशाची जागा नैराश्याच्या गर्तेत, मिरजेत 20 वर्षीय नर्सने विषारी इंजेक्शन घेऊन आयुष्य संपवलं, कारण…

तरुण तक्रारीसाठी पोलीस ठाण्यात गेला, कारण नसताना पोलिसाकडून कानशिलात, कानाचा पडदा फाटला