मनाच्या आडोशाची जागा नैराश्याच्या गर्तेत, मिरजेत 20 वर्षीय नर्सने विषारी इंजेक्शन घेऊन आयुष्य संपवलं, कारण…

मिरजेत आम्रपाली सतीश कांबळे नावाच्या 20 वर्षीय तरुणीने विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली आहे. ही तरुणी मिरजेत मराठे मिल चाळ रमा मात आंबेडकर कॉलनी येथे वास्तव्यास होती.

मनाच्या आडोशाची जागा नैराश्याच्या गर्तेत, मिरजेत 20 वर्षीय नर्सने विषारी इंजेक्शन घेऊन आयुष्य संपवलं, कारण...
प्रातिनिधिक फोटो

सांगली : सध्याचं वातावरण प्रचंड वाईट आहे. कोरोनाचं संकट सुरु आहे. अनेकांच्या नोकऱ्या हातातून निसटल्या आहेत. कुणी कमी पगारात काम करतंय, तर कुणी नोकरीसाठी धडपतंय. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी घडतंय. पण या संघर्षाच्या समयी काही तरुण आयुष्यातल्या आव्हानांसमोर, दु:खासमोर हार मानत आहेत. परिस्थितीशी झुंज देण्याऐवजी स्वत:हून स्वत:चा पराभव माणून आयुष्याचा जीवनप्रवास संपवत आहेत. सांगलीच्या मिरजेत देखील अशीच काहिशी घटना घडली आहे. अर्थात या घटनेमागील कारण वेगळं असू शकतं. पण आत्महत्या करुन प्रश्न सुटतील, असं नसतंच.

नेमकं प्रकरण काय?

मिरजेत आम्रपाली सतीश कांबळे नावाच्या 20 वर्षीय तरुणीने विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली आहे. ही तरुणी मिरजेत मराठे मिल चाळ रमा मात आंबेडकर कॉलनी येथे वास्तव्यास होती. आम्रपाली मिरजेत एका खासगी रुग्णालयात नर्सिंगचं काम करायची. कोरोना काळात डॉक्टरांबरोबर नर्सेसने केलेलं काम कधीही न वसरता येणारं असंच आहे. नर्स रुग्णांना मानसिक आधार देतात. त्यांवा हवं नको ते बघतात. वेळप्रसंती त्या रुग्णांच्या आई-वडील काही होतात. पण अशी संवेदनशील जबाबदारी सांभाळणाऱ्या आम्रपालीने आत्महत्या का केली असेल? असा सवाल आता परिसरातील नागरिकांना सतावत आहे.

आम्रपालीची राहत्या घरात आत्महत्या

आम्रपालीने काल (9 ऑगस्ट) राहत्या घरी विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली. याबाबत तिच्या कुटुंबियांना माहिती मिळाल्यानंतर त्यांना आधी धक्काच बसला. त्यांनी तातडीने तिला उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत उशिर झाला होता. आम्रपाली हिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तिच्या मृत्यूचे वृत्त समजल्यानंतर कुटुंबियांनी टाहो फोडत प्रचंड आक्रोश केला.

पोलिसांकडून तपास सुरु

आम्रपालीच्या आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तिच्या राहत्या घरी दाखल झाले. त्यांनी घराची पाहणी केली. यावेळी आम्रपाली हिने लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. संबंधित घटना ही संवेदनशील असल्याने तिच्या सुसाईड नोटवरील माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. आम्रपालीच्या आत्महत्येमागील गूढ लवकरच समोर येईल, अशी शक्यता आहे. दरम्यान, मिरज महात्मा गांधी पोलीस स्टेशनमध्ये काल रात्री उशिरा आम्रपालीच्या आत्महतेची नोंद झाली असून पोलिसांचा तपास सुरु आहे.

हेही वाचा : तरुण तक्रारीसाठी पोलीस ठाण्यात गेला, कारण नसताना पोलिसाकडून कानशिलात, कानाचा पडदा फाटला

Published On - 12:03 am, Wed, 11 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI