Sachin Vaze : सचिन वाझेने अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी का ठेवली? सर्वात मोठं कारण समोर

| Updated on: Sep 04, 2021 | 8:59 AM

अंबानी स्फोटकंप्रकरणात (Mukesh Ambani bomb scare) आणि मनसुख हिरेन मृत्यू (Mansukh Hiren) यामध्ये सचिन वाझे मुख्य आरोपी आहे. सध्या सचिन वाझे जेलमध्ये आहे. सचिन वाझे हा ख्वाजा युनूस एन्काउंटर प्रकरणात निलंबित झाला होता. मात्र ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर 2020 मध्ये तो परत पोलीस दलात दाखल झाला.

Sachin Vaze : सचिन वाझेने अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी का ठेवली? सर्वात मोठं कारण समोर
सचिन वाझे
Follow us on

मुंबई : बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने (Sachin Vaze) उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी का ठेवली, याचं उत्तर अखेर मिळालं आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA ने कोर्टात तब्बल दहा हजार पानांचं चार्जशीट दाखल केलं आहे. यामध्ये सचिन वाझेने स्फोटकांची गाडी का ठेवलं त्याची कारणं मिळाली आहेत. सचिन वाझेला आपली जुनी ओळख परत मिळवायची होती. स्फोटकांच्या कारचा तपास करुन, उत्तम तपास अधिकारी म्हणून पुन्हा लौकिक मिळेल, अशी आशा सचिन वाझेला होती, मात्र इथेच तो फसला आणि जेलमध्ये गेला.

अंबानी स्फोटकंप्रकरणात (Mukesh Ambani bomb scare) आणि मनसुख हिरेन मृत्यू (Mansukh Hiren) यामध्ये सचिन वाझे मुख्य आरोपी आहे. सध्या सचिन वाझे जेलमध्ये आहे. सचिन वाझे हा ख्वाजा युनूस एन्काउंटर प्रकरणात निलंबित झाला होता. मात्र ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर 2020 मध्ये तो परत पोलीस दलात दाखल झाला. वाझेला थेट क्राईम इन्वेस्टीगेशन युनिट अर्थात CIU चे प्रमुख पद मिळालं.

नव्वदच्या दशकातील ‘एन्काऊंटर स्पेशलिस्ट‘ अशी ख्याती असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे जवळपास 16 वर्षांनंतर 2020 मध्ये पोलिस दलात परतले होते. मात्र मनसुख हिरेन हत्याप्रकरणात त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर, त्यांना आता पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे.

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर 24 फेब्रुवारी 2020 च्या रात्री स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ उभी करण्यात आली होती. ही गाडी सचिन वाझेचा मित्र मनसुख हिरेन यांचीच होती.

ओळख परत मिळवण्यासाठी कारनामा

सचिन वाझेला आपली जुनी ओळख परत मिळवायची होती. स्फोटकांच्या कारचा तपास करुन, उत्तम तपास अधिकारी म्हणून पुन्हा लौकिक मिळवायाचा होता. मात्र भलतंच घडत गेलं आणि सचिन वाझे जेलमध्ये गेला.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण नेमकं काय?

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली होती. ती स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांची होती. जी स्कॉर्पिओ अंबानींच्या घराबाहेर सापडली होती, त्या गाडीमालकाचा मृतदेह सापडला आहे. मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांचा मृतदेह 5 मार्चला मुंब्रा रेतीबंदर भागात सापडला होता. ही हत्या असल्याचा दावा करत NIA ने सचिन वाझे यांना अटक केली. सध्या ते कोठडीत आहेत.

मनसुख हिरेन यांची हत्या घडली त्या रात्री नेमकं काय घडलं, याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्या रात्री आरोपींनी हिरेन यांच्या नाकावर जबरदस्ती क्लोरोफॉर्म टाकलं. त्यामुळे हिरेन तात्काळ बेशुद्ध पडले. त्यानंतर आरोपींनी त्यांची हत्या केल्याचं सूत्रांनी सांगितलं. पोस्टमार्टमच्या रिपोर्टनुसार हत्येपूर्वी हिरेन यांच्या चेहऱ्यावर मार लागलेला होता. त्यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला मार लागलेला होता. मृत्यूपूर्वी हा मार लागलेला होता. तसेच त्यांच्या अंगावर काही ठिकाणी मार होता. विशेषत: डोक्यालाही मार लागलेला होता, असं सूत्रांनी सांगितलं.

संबंधित बातम्या 

अंतर ठेवून बसा, कोर्टात सचिन वाझे-सुनील मानेचा बोलण्याचा प्रयत्न, न्यायाधीशांनी फटकारलं

NIA कडून सचिन वाझे-सुनील मानेच्या कोठडीची मागणी, वाझेचे वकील म्हणतात ओपन हार्ट सर्जरीची गरज

कुटुंबाला भेटण्यासह सचिन वाझेच्या तीन मागण्या, NIA च्या विशेष न्यायाधीशांचा निर्णय काय?