Mumbai Goa Highway Accident : मुंबई-गोवा हायवेवर डंपरची डंपरला धडक, चालक जागीच खल्लास!

| Updated on: Jun 01, 2022 | 10:38 AM

पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. भरधाव डंपर चालकाला रस्त्याच्या बाजूला उभा केलेला डंपर न दिल्यानं हा अपघात घडला.

Mumbai Goa Highway Accident : मुंबई-गोवा हायवेवर डंपरची डंपरला धडक, चालक जागीच खल्लास!
भीषण अपघात
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway Accident) डंपरला मागून धडक दिल्यानं दुसऱ्या डंपरमधील चालकाचा मृत्यू झाला आहे. उभ्या डंपरला भरधाव डंपरने जोरदार धडक दिली. त्यामुळे या अपघाताची भीषणता (major Accident) अधिकच वाढली. मुंबई गोवा महामार्गावरच्या झाराप-पत्रादेवी बायपासवर हा भीषण अपघात झाला. मळगाव इथं उभ्या असलेल्या डंपरला मागून येणाऱ्या दुसऱ्या डंपरने जोरदार धडक दिली. या मागून आलेल्या भरधाव डंपरमधील (Sindhudurg Dumper Accident) चालकाचा जोरात मार बसून जागीच मृत्यू झाला. ही धडक इतकी भीषण होती की डंपर चक्क डिव्हायडरवर चढला आणि मागील डंपरचा चक्काचूर झाला. तर मागून धडक दिलेल्या डंपर चालकाचा मृतदेह डंबरच्या केबिनमध्ये अडकून पडला होता.

पहाटेच्या सुमारास अपघात

पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. भरधाव डंपर चालकाला रस्त्याच्या बाजूला उभा केलेला डंपर न दिल्यानं हा अपघात घडला. डोळ्यावर झोप आलेली असल्याकारणानं डंपर चालकाचं नियंत्रण सुटून हा अपघात घडला असावा, असाही संशय व्यक्त केला जातोय.

डंपरच्या या भीषण अपघातामुळे परशुराम राठोड या 24 वर्षीय चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा चालक कर्नाटकातील विजापूरचा असून तो कुडाळच्या गुढीपूर इथं राहायला होता. मृत चालकाला अखेर जेसीबीच्या साहाय्यानं डंपर मागे खेचल्यानंतर बाहेर काढण्यात आलं. सावंतवाडी पोलिसांनी या अपघातानंतर घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केलंय.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ :

चौपदरी हायवेमुळे वाहनांचा वेग वाढला..

दरम्यान, मुंबई गोवा हायवे आता चौपदरी झाला असल्यानं वाहनं सुसाट या हायवेवरुन हाकली जातात. त्यामुळे अति वेग जीवावर बेतण्याची शक्यता असून वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवाव, असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलंय.